vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ अंतर्गत पैलवान कै. मारूती चव्हाण – वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, (उपकंपनी) तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ मुख्य कंपनी सांगली या कार्यालयामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, 1 लाख रूपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. सन 2025-2026 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहील तथापि कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल 12 टक्केपर्यंतचे व्याज महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करते. व्याज परतावा योजना ऑनलाईन स्वरुपाची आहे. ऑनलाईन योजनेअंतर्गत www.vjnt.in या वेबसाईटवर जाऊन “नोंदणी” हा पर्याय निवडून ऑनलाईन अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे पोर्टवर सादर करावीत. एक लाख रूपये थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. लाभार्थीने 2 हजार 85 रूपयांचा नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड केल्यास लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

  अधिक माहितीसाठी महामंडळाचे सांगली जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, संभाजी नगर, दूरध्वनी क्र. 0233-2376383 येथे संपर्क करावा तसेच महामंडळाची वेबसाईट www.vjnt.in पाहावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

वाडा-भिवंडी रस्त्याचे काम गतीने करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा सुधारित प्रस्ताव तयार करावापाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश…

नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास एक तृतीयांश महिला आहेत; नवीन भारत महानगरांच्या पलीकडे व्यापक सहभागाचा साक्षीदार होत आहे : डॉ जितेंद्र सिंह

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा

संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन समाजात प्रेम, शांतता व सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta