vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपणासाठी नवी मुंबई महानगरपालिका उपलब्ध करून देणार वृक्षरोपे

जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपणासाठी नवी मुंबई महानगरपालिका उपलब्ध करून देणार वृक्षरोपे

        नवी मुंबई प्रतिनिधी  पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध वृक्षसंवर्धन कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. त्या अनुषंगाने ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांनी जाहीर केलेल्या ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचे निर्मूलन’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.

          या महत्वाच्या दिनाचे औचित्य साधून आपल्या शाश्वत भविष्यासाठी नवी मुंबई मधील शासकीय / निमशासकीय / अशासकीय कर्मचारी / सुजाण नागरिक / व्यापारी / युवक – युवती / विद्यार्थी / सामाजिक सेवाभावी संस्था / महिला बचत गट / ज्येष्ठ नागरिक आदी व्यक्ती / संस्था यांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

          या अंतर्गत वृक्षरोपणाकरिता रोपांची आवश्यकता असल्यास ती वृक्षरोपे नवी मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालयात उद्यान सहाय्यक समन्वयाची भूमिका बजावणार असून नागरिकांनी वृक्षारोपणाकरिता वृक्षरोपे उपलब्ध होण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.श्री.गणेश देशमुख – बेलापूर भाग 1/ वाशी – 8369788394श्री.विलास पडवळ – बेलापूर भाग 2 / नेरूळ -8369788394

श्री.गणेश देशमुख – वाशी – 9029917958

श्री.प्रविण जायगडे – तुर्भे – सानपाडा – 9167554482

श्री.श्रीकांत जाधव – कोपरखैरणे – 9699029933

श्री.दिपक रोहेकर – घणसोली – 959471652

श्री.राज बांगर – ऐरोली – 9272479444 श्री.अनिल गायकवाड – दिघा – 8108246729   तरी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लावून व जगवून सर्वांनी एकत्रितपणे आपले नवी मुंबई शहर हरित करण्यासाठी योगदान देऊया असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके अनुकंपाधारक व सरळसेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर

शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब; हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार

दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी बँकांनी जनजागृती करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत देण्यासाठी महामेळावा संपन्न- ⁠आतापर्यंत ३३४ खातेदारांना ३९ लाखांचा लाभ..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा मुंबईत ‘शून्य जिवीतहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री यांचे निर्देश

केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट योजना) अर्ज भरण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ