vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलीआरगच्या बौद्ध विहार इमारतीची पाहणी…

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलीआरगच्या बौद्ध विहार इमारतीची पाहणी…

        सांगली, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या आरग (ता. मिरज) येथील बौद्ध विहार इमारतीची पाहणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केली. यावेळी माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी इमारतीच्या दर्जेदार कामाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना करून येत्या 15 तारखेपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी केल्या.

    यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेवून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मेघराज भाते आदि उपस्थित होते.लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारतीचेही लोकार्पणदरम्यान तत्पूर्वी मिरज येथील वार्ड क्रमांक 20 मध्ये बांधण्यात आलेल्या लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महापालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण व समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, हे सुंदर असे बौद्ध विहार उभारण्यात आले असून, यातील ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. या ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवावे. या भागातील विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, या भागातील विविध विकासकामांसाठी प्रस्ताव द्यावेत. ती कामे मार्गी लावू, अशे त्यांनी यावेळी आश्वासित केले.

00000

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ ची ५.८ टक्के दराने परतफेड

भिलवडी स्टेशन ते नांद्रे स्टेशन दरम्यानचा रस्ता15 ते 18 फेब्रुवारी कालावधीसाठी बंद.

vishwatmaklokswamivarta

श्री विले पार्ले केळवणी मंडळाच्या दोन नवीन इमारतींचे उद्घाटन आणि नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समस्त जनसमुदायाचा सदैव ऋणी राहील मी…महेंद्र गोडभरले*तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रेणापूर

vishwatmaklokswamivarta

शंभर फुटी तिरंगा, प्रा. शरद पाटील स्मृती उद्यानाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन