vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

अलिबाग येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

अलिबाग येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

रायगड प्रतिनिधी :-सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, दिव्या अपार्टमेंट, यामाहा शोरुम, आर.सी.एफ.गेटसमोर, वेश्वी अलिबाग येथे कार्यरत आहे.

 या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनु.जाती, अनु.जमाती , विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्या मागास, अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थींनीकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व दुध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात, चपाती, भाजी/उसळ, लोणचे पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मांसाहार) देण्यात येते.

     अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रू.600/- निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय व गणवेश पात्र महा.विद्यार्थीनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता/रेनकोट/छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त रेनकोट, छत्री भत्ता, संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रिडा साहित्य,मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु.जमाती विद्यार्थीनींकरिता रूपये 2 लाख 50 हजारचे आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष विद्यार्थीनींकरिता रू.1 लाखाचे आत असावे.

 ऑफलाईन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2025-26 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक,आधारकार्ड, शाळा/कॉलेजचे बोनाफाईड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत.

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात उपलब्ध करण्यात आले आहेत. अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह,अलिबाग सौ.यु.एस.गुजेला (मो.8767339974) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल सौ.यु.एस.गुजेला यांनी केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज कपूर पुरस्कारांचे वितरण राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व उत्साहात संपन्न

अमृतच्या लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण सुरू

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा —जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटीचा प्रश्न थेट मुंबईत; उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या तक्रारीची वरिष्ठ पातळीवर दखल ,परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन माइंड यांच्याकडून तक्रारीची दखल बंद बससेवा व प्रवाशांच्या तक्रारींची चौकशी होणार निवेदन जालना विभागाकडे वर्ग करून कार्यवाहीचा अहवाल मागविला…

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..