vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वार्षिक सर्वसाधारण सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मार्गदर्शन;*नाविण्यपूर्ण उपक्रमास प्रोत्साहन द्या- गुलाब खरात *• पर्यावरण दिनानिमित्त घेतली शपथ

वार्षिक सर्वसाधारण सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मार्गदर्शन;*नाविण्यपूर्ण उपक्रमास प्रोत्साहन द्या- गुलाब खरात *• पर्यावरण दिनानिमित्त घेतली शपथ

        बुलढाणा, प्रतिनिधी) : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बुलढाणा येथील हिरकणी महिला प्रभागसंघ रायपूरची “वार्षिक सर्वसाधारण सभा” ग्रामपंचायत माळवंडी येथे आज दि. 5 जून रोजी घेण्यात आली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी विविध विषयावर मार्गदर्शन करुन नाविण्यपूर्ण उपक्रम तसेच गावात उपलब्ध नसलेल्या व्यवसायांवर भर देण्याचे आवाहन केले.

यावेळी अति. कार्यकरी अधिकारी श्री. मोहन, प्रकल्प संचालक राजेश इंगळे, डेप्युटी सीईओ (महिला बाल कल्याण) श्री. एंडोले, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव, जिल्हा व्यवस्थापक श्री. तऱ्हेकर, माळवंडी सरपंच संगीता चव्हाण, उपसरपंच अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.    मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिलांचा विकास कशाप्रकारे साधला जाऊ शकतो, बचतीचे महत्व, उद्योजक महिलांचे भविष्यातील नियोजन, उत्पादनाचे पॅकेजिंग, ब्रँडिंग, गुणवत्ता कशी असायला पाहिजे अशा विविध विषयावर सभेमध्ये सविस्तररित्या मार्गदर्शन केले. त्यानंतर मिशन Z+ उपक्रमा बद्दल माहिती दिली. यामध्ये गरीबातील गरीब कुटुंबातील ज्यांचे 1 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे. अशा 10 वी परीक्षेत चांगल्या गुणवत्तेने पास झालेल्या मुला मुलींसाठी मिशन Z+ उपक्रमाअंतर्गत त्यांच्यासाठी NEET, JEE, CET इत्यादी क्लासेसच्या फी भरणे गरीब कुटुंबांना शक्य होत नाही. तर त्या विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस ची व्यवस्था या उपक्रमांतर्गत होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी हिरकणी प्रभागसंघाचा लेखाजोखा, त्यातील आर्थिक उलाढाल तसेच वार्षिक सभेचे केलेले नियोजन या संदर्भात प्रशंसा करत त्यांनी पुढील वाटचालीस कर्मचारी व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

      पर्यावरण दिनानिमित्त सन्मानिय व्यासपीठावरील अधिकारी कर्मचारी तसेच उपस्थित हिरकणी महिला प्रभागसंघाचे सर्वसाधारण सभेचे सन्मानिय पदाधिकारी यांची ‘पर्यावरण संरक्षण तसेच संवर्धनाबाबत’ शपथ घेण्यात आली. प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी व्यवसायाबाबत महिलांच्या संकल्पना, येणाऱ्या समस्या, विषयी मार्गदर्शन केले. समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला इतर समूहातील महिलांनी प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे जेणेकरून ती महिला स्वतः प्रोत्साहित होऊन आपला व्यवसाय जोमाने करेल..  वार्षिक सर्वसाधारण सभा विषय :- मागील वर्षात प्रभागसंघाने केलेल्या कामाचा आढावा आणि पुढील वर्षाचे नियोजन यासंबंधी चर्चा करणे, प्रभागसंघाचे धोरणात्मक निर्णय घेणे, उपसमित्ताने केलेल्या कामाचा आढावा घेणे, वार्षिक सभासदत्व आणि भाग भांडवल याबाबत निर्णय घेणे, प्रभागसंघाचे काम सुरळीत चालवण्यासाठी नियम, नियमावली तयार करणे, प्रभागसंघाच्या कर्मचाऱ्यांचा कामांचा आढावा घेणे, गावातील तालुक्यातील सामाजिक प्रश्नांवर चर्चा आणि त्या संबंधातील उपाययोजनांसाठी नियोजन करणे, सदस्यांना प्रभाग संघाने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणे, आणि महत्त्वाचे म्हणजे वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे तरतुदी सुचवणे. वार्षिक सर्वसाधारण सभा हिरकणी महिला प्रभागसंघ अध्यक्ष सविता तरमळे, सचिव ज्योती सुरुशे, तालुका अभियान व्यवस्थापक श्रीपाल सोनटक्के, तालुका व्यवस्थापक सिंगतकर, प्रभाग समन्वयक (रायपूर प्रभाग) निलेश इंगळे, गिरीधर हिवाळे, दत्तात्रय तळेकर, रायपूर प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ति, लेखापाल विद्या पाटोळे, तसेच रायपूर प्रभागातील ग्रामसंघ पदाधिकारी तसेच सर्व साधारण सभेतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

00000

संबंधित पोस्ट

जी.डी.सी. अण्ड ए .व सी. एच. एम. परीक्षेचा अर्ज भरण्यास 17 मार्चपर्यंत मुदतवाढ..

बुलढाणा जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ वारसांना सातबारावर नोंदणी करण्याची संधी १ ते ३१ मार्चपर्यंत कालबध्द कार्यक्रम चिखली तहसीलचा उपक्रम जिल्हास्तरावर

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘इंडिया मेरीटाईम वीक-२०२५’ मध्ये५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

काँग्रेसने संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याने जालन्यात भाजप आक्रमक, जोरदार निषेध आंदोलन संसदेचा अवमान हा देशाचा अपमान – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

मिरा-भाईंदर मतदारसंघातील,विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा..

पुढील ३ तासात लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची; तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.

vishwatmaklokswamivarta