vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने घ्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथील बैठकीत आदेश

कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने घ्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथील बैठकीत आदेश

मुंबई, प्रतिनिधी :- कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने १५ दिवसाच्या आत घेतला नाही, तर जिल्हा क्रीडा संकुल समिती याबाबत निर्णय घेऊन शासनाला कळवेल, या जागेबाबत त्यापुढील कार्यवाही शासनस्तरावरुन करण्यात येईल, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे तालुका क्रीडा संकुलाच्या जागेसंदर्भात उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले व उप नगराध्यक्ष संतोष मेहत्रे उपस्थित होते.

कर्जत तालुका क्रीडा संकुलासाठी भांडेवाडी येथील जागेला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार कामास सुरुवात करण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने अतिरिक्त जागेची गरज लक्षात घेता बर्गेवाडी अथवा इतर पर्यायी दोन ते तीन ठिकाणांची जागेची मागणी तालुका क्रीडा संकुल समितीने करावी, इतर तीन ते चार जागेचे सुयोग्य पर्याय सुचविण्यात यावेत, तसेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडून हे पर्याय तपासून घेण्यात यावेत, असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले.

बैठकीस क्रीडा आयुक्त शितल उगले दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. तसेच महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, सहसंचालक सुधीर मोरे, कर्जत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अक्षय जायभाये उपस्थित होते.

 

0000

संबंधित पोस्ट

खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी पटकावले स्वर्णपदक..

फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह विशेष उपक्रमात सहभाग नोंदवावा

राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन व टेनिक्वाईट स्पर्धेचा समारोप…

vishwatmaklokswamivarta

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऑलिंपिक दिनाचे आयोजन

जिल्हा क्रीडा संकूलातील अथलेटिक्स खेळ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक नियुक्तीसाठी 31 मे पर्यंत अर्ज करा- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर