vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठीराज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण- मंत्री प्रकाश आबिटकर

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठीराज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण- मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये यासाठी “नो शॉर्टेज, नो वेस्टेज” हे धोरण अंमलात आणावे. हे धोरण तातडीने तयार करून सादर करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्य भवन येथे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव श्री. बेंद्रे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.आबिटकर म्हणाले, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, तसेच विविध नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतली जातात. अशावेळी संकलित होणाऱ्या रक्ताला त्वरित मागणी नसल्यास रक्त वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. त्याउलट, उन्हाळ्यात व सणासुदीच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्या घटल्यामुळे रक्ताचा तुटवडाही जाणवतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी नवीन धोरण उपयोगाचे ठरणार आहे.

राज्यात रक्तपेढ्या स्थापन करणाऱ्या संस्थांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी नवी नियमावली तयार करावी. राज्यातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये नॅट (NAT) टेस्टिंग (न्यूक्लिअरिक अॅसिड टेस्टिंग) सुरू करण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करून अहवाल सादर करावा, असेही मंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतील खारघर येथील प्रशिक्षण केंद्र आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

संबंधित पोस्ट

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह ‘एसआयआर’च्या कामाला गती द्यावी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी*मुरूम येथील श्रीमंत सुभेदार *मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी*सहकार्य करणार**-विधान परिषदेचे सभापती राम शिंदे* 

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या नियोजनाचामहिला व बाल विकास मंत्री कु तटकरे यांनी घेतला आढावा..

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन…