vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा श्री श्री क्षेत्रीय आळंदी ते श्रीक्षेत्रीय पंढरपूर माझे पंढरपुर.. केशव महाराज व सदानंद महाराज दिंडी सोहळा…

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा श्री श्री क्षेत्रीय आळंदी ते श्रीक्षेत्रीय पंढरपूर माझे पंढरपुर.. केशव महाराज व सदानंद महाराज दिंडी सोहळा…

राज्य प्रतिनिधी -आषाढी वारी पालखी सोहळा याही वर्षी संपन्न होत आहे याकरिता दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना आणि वारकऱ्यांना जागोजागी ठिकठिकाणी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पूर्तता करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सालाबादाप्रमाणे पाण्याचे टँकर पुरवण्याची अविरत सेवा सुरू ठेवल्याबद्दल विभागात त्यांचे कौतुक केले जात आहे-

श्री क्षत्रिय खरोळा पांढरी-आदरणीय श्री. सुरेंद्रभैय्या गोडभरले यांनी दिंडीसाठी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी अविरत टँकर सेवा केली… 🚩🎉दरवर्षी श्रीमान ओमप्रकाश बांकटलाल उपाध्ये श्रीक्षेत्र खरोळा यांच्या लातूर येथील निवासस्थानी श्री केशव महाराज श्री सदानंद महाराज आषाढी पायी दिंडी सोहळा या दिंडीचे आळंदीला जातेवेळी स्वागत असते.तसेच आदरणीय सौ. चंदाताई ओमप्रकाश उपाध्ये या दिंडीत सहभागी असून पायी वारी करतात.

दिंडीसाठी अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे पाण्यासाठी टँकर याची सेवा माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्री. सुरेंद्रभैय्या गोडभरले गेली 7 वे वर्ष दिंडीस टँकर सेवा देत आहेत.

तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी हे अविरत सेवा करत आपले संप्रदायीक कर्तव्य पार पाडले. ह्या दिंडीच्या दर्शनाचे भाग्य लाभले.

महाराष्ट्राच्या संप्रदायाचे आपणही काही देणं लागतो, ह्या सद्भावनेतून श्री. केशव नारायण महाराज, श्री. सदानंद महाराज दिव्य पादुका रथासाठी २१००० /- रुपये देणगी दिली. 🙇🏻‍♂️आणि दिंडीतील वारकरी बंधू भगिनींना त्यांच्या पुढील वारी प्रवासास खूप-खूप शुभेच्छा दिल्या. जय हरी विठ्ठल…

संबंधित पोस्ट

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर

पायभूत सुविधा निर्मितीतून लातूर पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• लातूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण• नवनियुक्त ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप• क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभ

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्मृतीपत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

अंगणवाडी गुणवत्ता विकास प्रक्षीक्षण संपन्न

नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर-सिडकोच्या अखत्यारीतील स्थानके येत्या ६ महिन्यात मध्य रेल्वेकडे होणार हस्तांतरित२० वर्षानंतर ऐतिहासिक निर्णय मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश..

महाराष्ट्राचे देशाच्या योगदानात मोठा वाटा : केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार,नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा पुढचे पाऊल तर्फे सत्कार विविध योजनांच्या माध्यमातून मराठी टक्का वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा..