vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबई, प्रतिनिधी : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे यांच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. आदिवासी योजनांचे सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणीसाठी ही आराखडा पुस्तिका उपयुक्त ठरणार असल्याचे मत मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी खासदार हेमंत सवरा, आमदार भीमराव केराम, आमदार संजय पुराम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी उपस्थित होते.

 मंत्री डॉ. वुईके म्हणाले, या आराखडा पुस्तिकेत टीआरटीआयच्या आगामी वर्षातील संशोधन, प्रशिक्षण, मूल्यांकन व धोरणात्मक उपक्रमांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

 विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या होण्यासाठी हा आराखडा मार्गदर्शक ठरेल. कामाच्या या आराखड्यामुळे कामास गती येऊन सर्व कामे विहित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

0000000

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज प्रक्रियेबाबत खुलासा;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल पुनरीक्षण 2026′ (SIR) कार्यक्रम माहिती घेण्याकरिता येणाऱ्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे  –जिल्हाधिकारी किशन जावळे

जालना मनपाच्या विभागांना जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला कालबद्ध कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरीकांच्‍या मदतीसाठी हेल्‍पलाईन

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसादउमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार- व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील टॉप डिजिटल पोस्टर बॅनर तयार करणाऱ्या एस.एस.पी.क्रिएशन च्या  तृतीय वर्षात वाटचाल…

vishwatmaklokswamivarta