vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

रायगड(जिमाका) प्रतिनिधी दि.15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 जुलै, 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत डॉ. के.एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस, प्लॉट न. 10, सेक्टर 16 न्यू पनवेल इस्ट ता. पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार रायगड-अलिबाग यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व खाजगी उद्योजकांनी आपल्या आास्थापनेतील कुशल/अकुशल रिक्तपदे जास्तीत जास्त या कार्यालयास कळविण्यात यावीत. शासनाच्या माध्यमातून खाजगी कंपन्यातील जास्तीत-जास्त रिक्तपदे रोजगार मेळाव्यातून भरती करण्यात येणार आहे. याकरिता या विभागाचे संकेतस्थळावर https://rojgar.mahaswayam.gov.in नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी. ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त संकेतस्थळावर Employment – Employer (List a Job)- Employer Loginया क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील PanditDindayalUpadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्ह्याच्या नावावरील View Details – Job Details – Agreeand Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील Save Vacancy वर क्लीक करावे. त्याचप्रमाणे ज्या आस्थापनांची यापूर्वी उपरोक्त संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेली नाही त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.inया संकेतस्थळावरEmployment-Employer (List a Job)-Registerया क्रमाने जाऊन नवीन नोंदणी करावी व आपल्या आस्थापनेची नवीन नोंदणी केल्यानंतर आपल्याकडील रिक्तपदे अधिसूचित करुन संकेतस्थळावर दि. 10 जुलै 2025पर्यंत अधिसूचित करावीत.

संकेतस्थळावर नवीन नोंदणी करणे व रिक्तपदे अधिसूचित करणे या संदर्भात आपणास काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा श्री. महेश भा.वखरे, लिपिक-टंकलेखक यांचे 9421613757 या भ्रमनध्वनी क्रमांकावर वर संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या विविध विषयांवरील २८० निवेदने स्वीकारली

दर्जा, ट्रेसेबिलिटी आण मूल्यवर्धनावर भर दिल्यास निर्यात संधी अधिक वाढतील – सचिव एन. भवानीश्री शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्यासाठी खरेदीदार-विक्रेता मेळावा प्रभावी व्यासपीठ- जिल्हाधिकारी,हळद क्षेत्रातील शेतकरी-निर्यातदार संबंध मजबूत करण्यासाठी खरेदीदार-विक्रेता मेळावा

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन होणार दक्षता समिती शिक्षण मंडळाचा निर्णय

vishwatmaklokswamivarta

आमदार संजय खोडके, सुलभा खोडके यांची कौशल्य विकास कार्यालयाला भेट

गुन्हयांच्या सिद्धतेकरीता गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल,पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते  अनावरण..

माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन