vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दि .4 जुलै रोजी मुंबईत**गेटवे ऑफ इंडिया जवळ कॅन्डल मार्च**केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणार*

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दि .4 जुलै रोजी मुंबईत**गेटवे ऑफ इंडिया जवळ कॅन्डल मार्च**केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणार*

 मुंबई प्रतिनिधी ~ अहमदाबाद मध्ये एयर इंडियाच्या जंबो जेट विमान अपघातात 240 लोक मृत्युमुखी पडले. या अत्यंत भीषण अपघातात मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी 6वाजता मुंबईत रेडिओ क्लब ते गेट वे ऑफ इंडिया असा कॅन्डल मार्ग काढण्यात येणार आहे.या कॅन्डल मार्च मध्ये बॉलिवूड चे अनेक सेलिब्रिटी कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी अभिनेत्री संगीता कापूरे आणि अभिनेते गौरव शर्मा हे प्रयत्नशील आहेत.या कॅन्डल मार्च मध्ये मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनीही केले आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित या कॅन्डल मार्च च्या नियोजनाची बैठक बांद्रा येथे आज घेण्यात आली.त्यात रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे;मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार; खजिनदार सुनील मोरे जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे; जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड;प्रकाश जाधव संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या कॅन्डल मार्चा ला आज  सायंकाळी 6 वाजता मुंबईत रेडिओ एन क्लब येथून सुरुवात होणार असून. गेट वे ऑफ इंडिया येथे समारोप करण्यात येणार आहे.या कॅन्डल मार्च मध्ये अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना रिपब्लिकन पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.या कॅन्डल मार्च चे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले करणार आहेत.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे अभिनेत्री संगीता कपूरे गौरव शर्मा सिद्धार्थ कासारे सर्व रिपब्लिकन जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपाइं तर्फे देण्यात आली आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एक दिलाने काम करुया-पालकमंत्री शंभूराज देसाई

नगरपरिषदांच्या सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर…

vishwatmaklokswamivarta

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

केंद्राच्या चार श्रम संहितांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध; हरकती व सूचना नोंदवण्याचे कामगार उपआयुक्त कार्यालयाचे आवाहन

जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळण्याकरिता“समता पंधरवडा” विशेष मोहिम सुरु