vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि. 13 व 16 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दि. 17 जून 2025 रोजीच्या सुधारित अधिसूचनेनुसार बुलडाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींतील सरपंच पदांचे आरक्षण सोडत 8 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा निवडणूक इमारत, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे काढण्यात येणार आहे.

या सभेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांसाठी सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासोबतच अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, मागास प्रवर्ग महिला व खुल्या प्रवर्ग महिला यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

या महत्त्वाच्या प्रक्रियेस तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत फेरीवाले, होर्डींग – बॅनर्स, वाहने यावर सातत्यपूर्ण धडक कारवाया

vishwatmaklokswamivarta

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा आणि राज्यगीत अनिवार्य

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांना  सतर्क राहण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन – शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त..

नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही– मंत्री उदय सामंत

लातूर जिल्ह्यात 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा घेतला आढावा.. सिंचन प्रकल्पांची पाहणी करण्यासह संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना.