vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंढरपूर पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांसह भाविकभक्तांनी घेतला महाप्रसादाचे लाभ

पंढरपूर पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांसह भाविकभक्तांनी घेतला महाप्रसादाचे लाभ

       राज्य प्रतिनिधी- देहू-आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यासह भावीक भक्तांना एमआयटी पुणे आणि कराड परिवाराच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी वाखरी येथील एमआयटी परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाबरोबरच वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, भाविक भक्तांच्या कुस्ती स्पर्धा घेण्यात आली आणि सर्वांना मोफत आरोग्य सुविधा पुरवण्यात आली.

         एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड साहेब यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी देहू-आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यासह भाविक भक्तांना विविध सोयी सुविधा पुरवल्या. शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात वाटप केले. श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड, एमआयटी वर्ल्ड पीसचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, हिंदकेसरी पै.दिनानाथ सिंग हभप तुळशीराम कराड, प्रगतशील शेतकरी काशीराम कराड,लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड, संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे राजेश कराड, भाजपाचे विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, त्र्यंबकआबा गुट्टे यांच्यासह कराड परिवारातील सर्व सदस्य व इतर अनेकांनी प्रसाद वाटप केला. या प्रसादाचा लाखो भाविक भक्तांनी लाभ घेतला.

      दरम्यान पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विविध दिंड्यातील प्रमुख विणेकऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. अनेक वारकऱ्यांच्या आरोग्य तपासण्या करून औषध उपचार वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या यातून भक्ती आणि शक्तीचा संगम दिसून आला. एकूणच दोन दिवस एमआयटी परिसरात मोठ्या उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित पोस्ट

माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार- राज्‍य माहिती आयुक्त गजानन निमदेव

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

अंतर्गत रानभाजी पदार्थ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा-न्यायालयीन कामकाजात अधिकाधिक मराठीचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात- आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

भालीवडी कन्या आश्रमशाळेत जनजाती गौरव दिवस उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta