vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

नवी दिल्ली प्रतिनिधी -पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नामीबियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नेटुम्बो नंदी-नदैतवा यांच्या हस्ते आज पंतप्रधानांना नामीबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय नेते ठरले आहेत.

पंतप्रधानांनी हा सन्मान स्वीकारताना तो भारतातील 1.4 अब्ज जनतेचा आणि भारत-नामिबिया यांच्यातील ऐतिहासिक आणि दृढ संबंधांचा सन्मान असल्याचे सांगितले. राष्ट्राध्यक्ष नंदी-नदैतवा आणि नामिबियाच्या जनतेचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.

पंतप्रधानांना मिळालेला हा सन्मान भारत आणि नामिबिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. दोन्ही देशांतील युवा पिढ्यांसाठी ही एक प्रेरणादायक घटना ठरेल आणि द्विपक्षीय विशेष भागीदारीला अधिक उंचीवर घेऊन जाईल.

 

संबंधित पोस्ट

गोवा पोलिसांनी अर्पोरा नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर जनरल मॅनेजर आणि तीन कर्मचाऱ्यांसह चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील