vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा

सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा

            सांगली, प्रतिनिधी : जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी अमली पदार्थ विषयातील भविष्यकालिन संकट व धोके लक्षात घेऊन संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने व जाणिवपूर्वक पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, अमली पदार्थांच्या सेवनाने भावी पिढीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालये, तंत्रनिकेतन, आय. टी. आय. मधील विद्यार्थ्यांमध्ये यामध्ये नियमित जनजागृती करावी. त्याची अंमलबजावणी होते कि नाही, हे पाहण्यासाठी संबंधित विभागप्रमुखाने आकस्मिक भेटी द्याव्यात. वसतिगृहांची वेळोवेळी तपासणी करावी. विद्यार्थ्यांतील वर्तणुकीय बदल (बिहेव्हिरीयल चेंजेस) टिपावेत. त्याचे समुपदेशन करावे, असे त्यांनी सांगितले.

समितीच्या सदस्यांनी नियमित करावयाच्या बाबींसाठी कोड ऑफ कंडक्ट तयार करावे, अशा सूचना करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, यापूर्वीच्या बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे एमआयडीसी कार्यक्षेत्रात चालू व बंद असलेल्या कारखान्यांची, मेडिकल दुकानांची तपासणी करून प्रत्येक महिन्याला त्याचा अहवाल सादर करावा. तसेच, व्यसनमुक्ती चिकित्सा, उपचार व समुपदेशन केंद्र सुरू करण्याची कार्यवाही त्वरित करावी.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी अमली पदार्थांचे आव्हान महाविद्यालयीन युवकांना बाधित करणार नाही, यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. अन्य विभागांनी केलेले व्हिडिओ, पोस्टर्स उपलब्ध करून दिल्यास सदर जनजागृती वेळी प्रदर्शित करण्यात येतील, असे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजचे डॉ. राजकिरण साळुंखे, शासकीय रूग्णालयाचे डॉ. विभीषन सारंगकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम”शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी सुरू 21 डिसेंबर रोजी होणार खारघर येथे भव्य कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा ठाणे क‌ाँग्रेस कडून निषेध  राहुल गांधी `रिस्पेक्टेड नेते’ – विक्रांत चव्हाण 

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार– केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव· मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ· गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लेखक बर्जिस देसाई लिखित ‘मोदीज मिशन’ पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम