vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करा· महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करा· महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा

मुंबई प्रतिनिधी : वसई – विरार परिसराचा झपाट्याने विकास होत असून या भागाकरिता रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करावा. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राचे लवकरात लवकर महापालिकेकडे हस्तांतरण करावे. महापालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या सर्व कामांचा निर्धारित कालावधीतील कार्यक्रम आखून सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर आगामी एक महिन्याच्या कालावधीत महापालिका आणि गृह विभागाने कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वसई विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वसई-विरार महापालिकेने पायाभूत सुविधांची कामे करताना एक कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करून आरोग्य, रस्ते, पुलांची प्रलंबित कामे, परिवहन, गृहनिर्माण प्रकल्प यासह सर्व विभागातील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून विहित कालावधीत कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. महापालिका क्षेत्रातील ज्या रस्त्यांसाठी जागा उपलब्ध आह

संबंधित पोस्ट

इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना;एनएसएपी पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा समर्थकांसह भाजपा मध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट-भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार..

जालना येथे 15 जुलै 2026 रोजी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”

राष्ट्रीय व राज्य महिला आयोगातर्फे राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

धारावी विभागात भाजपा आणि चेंजर बॉईज कबड्डी टीम* यांच्या वतीने दोन दिवसीय *भव्य कबड्डी स्पर्धा* चे आयोजन

vishwatmaklokswamivarta