vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

अँटॉप हिल परिसरातील अल्पवयीन चार वर्षाच्या  मुलीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीस 12 तासात  अटक

अँटॉप हिल परिसरातील अल्पवयीन चार वर्षाच्या  मुलीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीस 12 तासात  अटक

मुंबई गुन्हे प्रतिनिधी-अँटॉप हिल परिसरातील अल्पवयीन चार वर्षाच्या  मुलीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीस बारा तासात आणि अँटॉप हिल पोलिसांनी अटक 162 सीसीटीव्ही ची तपासण करून आरोपीचा शोध घेऊन राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना  त्याला अटक केली

पोलिसांच्या माहितीनुसार,अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून करणा-या गंभीर गुन्हातील आरोपीस १२ तासाच्या आत अटकसदर गुन्हयातील आरोपी शोध कामी एकून १६२ सी.सी.टी.व्ही. कॅमेर तपासून आरोपी निष्पन्न करण्यात आला. सदर आरोपी हा सतत स्वतःचे अस्तित्व लपवून मुंबई शहर व ठाणे शहरामध्ये वेगवेगळया ठिकाणी फिरत होता, सदर आरोपीचा तांत्रिक कौशल्याचा आधारे शोध घेत असताना तो लोअर परेल, मुंबई येथे आला असल्याची खात्री झाली. सदर आरोपी हा लोअर परेल परिसरातील वरळी नाका येथील बस स्थानकावर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अटक केलीकरून अन्टॉप हिल पोलीस ठाणे, मुंबई यांनी गुन्हा उघडकीस आणले दिनांक १५/०७/२०२५ रोजी ००:४५ वाजताच्या सुमारास फिर्यादी नामे नाजीय शेख, दय ४० वर्षे यांनी

दिलेल्या फिर्यादीप्रमाणे त्यांची मुलगी वय ३ वर्षे, ११ महिने हिला दिनांक १४/०७/२०२५ रोजी २०:०० वाजता ते १५/०७/२०२५ रोजी ००:१० वाजताच्या दरम्यान अज्ञात इसमाने फुस लावून पळवून घेवून गेल्याने अज्ञात आरोपीविरोधात अन्टॉप हिल पोलीस ठाणे, गु.र. क. ३६१/२५ कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा तपास करीत असताना दिनांक १५/०७/२५ रोजी १२:३० वाजता कुलाबा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनोळखी बालिकेचा मृतदेह मिळून आल्याबाबत शोध पत्रिका प्राप्त झाली. सदर शोधपत्रिकेतील मयत मुलगी ही नमुद गुन्हयातील अपहृत बालिका असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नमुद गु.र.क.३६१/२५ कलम १३७(२), भारतीय न्याय संहिता या गुन्हयामध्ये कलम १०३,१४० (२), २३८ भारतीय न्याय संहिता सह कलम ७५ बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधियम २०१५ अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एकून १० पथके तयार करण्यात आली. सदर गुन्हयातील आरोपी शोध कामी एकून १६२ सी.सी.टी.व्ही. कॅमेर तपासून आरोपी निष्पन्न करण्यात आला. सदर आरोपी हा सतत स्वतःचे अस्तित्व लपवून मुंबई शहर व ठाणे शहरामध्ये वेगवेगळया ठिकाणी फिरत होता, सदर आरोपीचा तांत्रिक कौशल्याचा आधारे शोध घेत असताना तो लोअर परेल, मुंबई येथे आला असल्याची खात्री झाली. सदर आरोपी हा लोअर परेल परिसरातील वरळी नाका येथील बस स्थानकावर पळून जाण्याचे तयारीत असतांना त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीकडे गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता, मयत मुलगी ही आरोपी व त्याची पत्नी यांच्यामध्ये अडसर ठरत असल्याचा राग मनात धरून तिच्या राहत्या घराच्या परिसरातून अपहरण केले व भाज्या धक्का, मुंबई येथे नेवून लिया गळा आवळून खून केला तसेब पुरावा नष्ट करण्याच्या उद्देदेशाने तिचा मृतदेह समुद्रात फेकून दिल्याची कबुली दिली असल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आले आहे.

सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी (कायदा व सुव्यवस्था), अप्पर पोलीस आयुक्त श्री. विक्रम देशमाने (मध्य प्रादेशिक विभाग), पोलीस उप आयुक्त श्रीमती रागयुधा आर, (परिमंडळ ४), सहा. पोलीस आयुक्त श्री. शैलेंद्र थिवार (सायन विभाग), यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि. केशवकुमार कसार, पो. नि. गोपाळ भोसले, पो.नि. किशोरकुमार राजपूत, म.पो.नि. अर्चना पाटील, स.पो. नि. शिवाजी मदने, स.पो.नि. प्रदिप पाटील, स.पो.नि. आण्णासाहेब कदम, स.पो.नि. कांबळे, स.पो.नि. निगुडकर, पो.उप.नि. विनोद पाटील, पो.उप.नि. सिध्दकी, पो.उप.नि. राहुल वाघ, पो.उप.नि. केदार उमाटे, पो.उप.नि.गौरव शिंदे, म. पो.उप.नि. सरोजिनी इंगळे, म.पो.उप.नि. पूजा शिर्के, पो.ह.क.०७०९०६/टेळे, पो.ह.क. ०७०४९१/गरते, पो.ह.क. ९७०५६९/सानप, पो.ह.क.०७०६७४/ठोके, पो.ह.क्र.९८०९६९/सिंग, पो. ह.क.०७०७२३/तांबे, पो.शि.क.११०७९५/आमदे, पो.शि.क. १५०४५८/किरतकर, पो.शि.क. १५१४४६/राजगणे, पो.शि.क. ०९२५१६/पाटील, पो.शि. क. १११११८/ माने, पो. शि.क. १५०२३१/माने, पो.शि. क. १४२४३१/खोत, पो.शि.क. १३०१८७/बाशी, पो. शि.क. १३०६१८/वहान, पो. शि.क. १४१५०१/ सनगर, पो. शि.क. १४१८५६/भोसले, पो.शि.क. १५०४५६/घाडगे, पो.शि.क.०९३७०१/ठाकूर, १४२४९४/गांढरे यांनी पार पाडली आहे.00000

संबंधित पोस्ट

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025  मंगळवारी साप्ताहिक बाजार राहणार बंद

vishwatmaklokswamivarta

आजच्या राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाच्या कार्याला एकात्म मानवदर्शन विचारांचे पाठबळ – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

स्वातंत्र्यदिनानिमित्त मेळघाट हाट येथे खादी महोत्सव

पनवेल येथे उद्योग सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती; जलवाहतूक आणि हेलिपॅड सुविधांवर भर – मंत्री नितेश राणे मुंबईतील सागरी वाहतूक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२६ साठी जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील