vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे ५५ टक्के काम पूर्ण- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे ५५ टक्के काम पूर्ण- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, प्रतिनिधी : सोलापूर विभागातील अक्कलकोट बसस्थानकाची जीर्ण झालेली इमारत नव्याने बांधण्यात येत असून, या प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पावसाळ्यानंतर जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत दिली.

सदस्य सचिन कल्याणशेट्टी यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, सन १९६१ मध्ये उभारलेले जुने बसस्थानक आता वापरण्यायोग्य राहिले नसल्याने २८.९७ कोटी रुपये खर्चाच्या पुनर्बांधणी प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. प्रवाशांसाठी तात्पुरते १२ फलाटांचे पत्र्याचे बसस्थानक उभारण्यात आले असून, वाहतूक सुरळीत सुरू आहे. बसस्थानकासाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे, चारही बाजूंनी कुंपणभिंत आणि मुख्य प्रवेशद्वार इमारतीच्या मध्यभागी ठेवण्यात आले आहे. दक्षिण बाजूस नगरपरिषदेचा १५ ते २० फूटाचा काँक्रीट रस्ता असून, तो स्थानिक नागरिकांकडून रहदारीसाठी वापरण्यात येतो. मात्र या बाजूस एसटी महामंडळाच्या संरक्षक भिंतीमधून रस्ता सोडण्याचे कोणतेही नियोजन नाही. गाळे किंवा रस्त्यासाठी एसटी महामंडळाची जागा कोणालाही देण्यात येणार नाही. अशी कुठलीही मागणी आलेली नसल्याचे परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

000000**

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’साठी प्रकल्प विकासकांना आवश्यक परवानग्या ऑनलाईन देण्यात याव्यात. हा प्रकल्प राबविताना येणाऱ्या समस्या जिल्हा, गाव, मंत्रालयस्तरावर सोडवा. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण, कार्यान्वित होण्याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाहावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणाऱ्या निधीपेक्षा कमी !छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार?

vishwatmaklokswamivarta

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 28.62 टी.एम.सी. पाणीसाठा..

सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे भविष्य सुरक्षित करा- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta