vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषि विभागाकडून आवाहन*

*प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषि विभागाकडून आवाहन*

सातारा प्रतिनिधी: याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या 9 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू आहे. 15 जुलै अखेर जिल्ह्यातील केवळ 2400 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यामध्ये पावसाच्या संततधारेमुळे बहुतांश ठिकाणी मशागतीची व पेरणीची कामे खोळंबली आहेत. ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे. तेथील पिकाचे सततच्या पावसाने नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, इत्यादी कारणाने नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै अखेर या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.

बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तीकरित्या आपले अर्ज विमा कंपनीस सादर करुन अथवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारेही या योजनेत सहभागी होऊ शकतील योजनेत सहभागी योजण्यासाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे. त्या बँकेत जाऊन अथवा पोस्ट कार्यालय, विमा कंपनी एजंट किंवा सर्वाजनिक सुविधा केंद्र व विमा कपंनीच्या संकेतस्थळाद्वारे 31 जुलै 2025 पूर्वी हप्ता भरावा. अधिक माहिती साठी गावपातळीवरील सहाय्यक कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !अधिकाधिक हिंदूंना संघटित करा ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

महाकुंभपर्वात हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन युवकांना भावले; कार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

vishwatmaklokswamivarta

जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न मार्गी लावू; ‘दादांचा वादा’प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यवतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन..

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…

ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनास मदत -आमदार विक्रम काळे• औसा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे दिमाखात उद्घाटन; ग्रंथप्रेमींचा मोठा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta