vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते जवळगा (सेलू) येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते जवळगा (सेलू) येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

    राज्य प्रतिनिधी- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नंतर या भागातील जनतेने माझ्यावर प्रेम केले. माझे नेतृत्व रेणापूर तालुक्यातील जनतेने जोपासले हे कदापि विसरू शकत नाही मला मिळालेल्या आमदारकीच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात, वाडी वस्तीत जे जे कामे करणे शक्य आहे. ती सर्व विकास कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून जवळगा येथील आरोग्य उपकेंद्रास लागणाऱ्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार असे सांगून जवळगा गावच्या विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशीह ग्वाही भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील मौजे जवळगा येथील आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना दिली.

       राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रेणापूर तालुक्यातील मौजे जवळगा (सेलु) येथे 44 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्ताने आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते मंगळवारी झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय रमेश पाटील हे होते तर याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, भागवत सोट, पंचायतराज सेल जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीधर रेड्डी, खरोळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ परमेश्वर धप्पाधुळे, डॉ महेश पटाई, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ ज्ञानेश्वर खरोळे, भाजपाचे सतीश आंबेकर, अनिल भिसे, डॉ बाबासाहेब घुले, ओमप्रकाश गोडभरले, दशरथ सरवदे, रामराव मोरे, सुधाकर काळे, लक्ष्मण यादव, वसंत करमोडे, दिनकर राठोड, भाऊसाहेब गुळबिले, शेख जमील उपसरपंच निवृत्ती चिद्रे, नारायण राठोड यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

        यावेळी बोलताना आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, देशात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी गती मिळत असून गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते भाजपाच्या नेतृत्वाने करून दाखविले आहे. प्रत्येक समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत असून गोरगरीब सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक जनहिताच्या योजना सुरू करून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळत आहे

संबंधित पोस्ट

मेळघाट आरोग्य परिक्रमेत डॉक्टरांनी सक्रीय सहभाग नोंदवावा -जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगेंची ऐतिहासिक कामगिरी

विधानपरिषद लक्षवेधी :प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबईतील कबुतरांना नियंत्रित खाद्य पुरवण्याचा निर्णय नागरिकांवर, आजपासून हरकती, सूचना नोंदवता येणार…

रेल्वे पुलाचे बांधकामामुळे चांगेफळ ते जलंब खामगांव राज्यमार्ग बंद-पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन