vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात सपन्न

 ठाणे जिल्ह्यात रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात सपन्न

 

ठाणे प्रतिनिधी-

ठाणे जिल्ह्यात रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात सपन्न सदर रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत एकूण-21 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवाला यामध्येकला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली येथे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे यांच्या वतीने आणि जिवनदीप शिक्षण संस्था संचालित कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली यांच्या सौजन्याने रेड रन स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. रवींद्र घोडविंदे आणि ग्रामीण रुग्णालय गोवेली येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपलक्ष्मी मेश्राम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये 21 महाविद्यालयांतील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुला आणि मुलींसाठी स्वतंत्र गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आरोग्य, शिस्त, आणि सामाजिक जागरुकतेचा सुंदर संगम घडवून आणला.विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:मुलांचा गट:1. हरिओम सिंग – S.S.T. College2. विशाल कनोजिया – S.S.T. College 3. हरिओम मौर्य – B.K. Birla College (Night)

मुलींचा गट:1. सुजाता मुंडेकर – S.S.T. College, उल्हासनगर2. अंकिता डी. Pal– S.S.T. College, उल्हासनगर3. धनश्री व्ही. पडवळ – V.P.M. College, किनवली

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापकवर्ग, स्वयंसेवक तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, ठाणे यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचा उद्देश केवळ स्पर्धा नव्हे, तर HIV/AIDS विषयी जनजागृती, आरोग्य विषयक साक्षरता आणि युवकांमध्ये सकारात्मक विचारांची बीजे पेरणे हा होता.

000000000000

 

संबंधित पोस्ट

मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हास्तर प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन**पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीमुळे सुरेखा शिंदे पुन्हा स्वत:च्या पायावर उभ्या झाल्याआ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशील कृतीने मुलीच्या डोळ्यात आले पाणीआई पुन्हा चालू लागली… हे केवळ वैद्यकीय यश नाही, तर सुधीरभाऊंसारख्या संवेदनशील नेतृत्वामुळे शक्य

सेवाकर्मी पुरस्कार” कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान – १०० पैकी ८० गुणांकन…

vishwatmaklokswamivarta

भारताने प्रथमच पटकावला स्क्वॉश विश्वचषक, चेन्नई इथल्या अंतिम सामन्यात हाँगकाँगला नमवत केली सर्वोच्च कामगिरी..

vishwatmaklokswamivarta