vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीती पाणी पातळीत सातत्याने वाढ,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला संभाव्य पूरस्थितीचा आढावा- यंत्रणांनी सज्ज राहण्याचे दिले आदेश

कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीती पाणी पातळीत सातत्याने वाढ,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला संभाव्य पूरस्थितीचा आढावा- यंत्रणांनी सज्ज राहण्याचे दिले आदेश

सांगली, प्रतिनिधी : कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीती पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर संभाव्य पूरस्थितीचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून घेतला.

संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने यंत्रणांनी प्रभावी नियोजन करून सज्ज राहावे. सर्व यंत्रणांनी 24 तास सतर्क राहावे. जलसंपदा विभागाने पूरस्थितीच्या अनुषंगाने पाण्याची आवक व विसर्ग याबाबत आलमट्टी धरण व्यवस्थापनाशी योग्य तो समन्वय ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. संभाव्य पूरस्थितीत सुसूत्र समन्वयाव्दारे सांघिक आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

2019 च्या पुराचा अनुभव लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने, जबाबदारीने परस्पर समन्वय ठेवावा. गरजेनुरूप आवश्यक ती पूर्वतयारी व कार्यवाही करावी. नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावेत. त्या ठिकाणी जबाबदार व्यक्तिंची नेमणूक करावी. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आवश्यक ती तयारी ठेवावी. संभाव्य पूरस्थिती उद्‌भवल्यास नागरिकांचे व पशुधनाचे स्थलांतर, सुस्थितीतील निवारा केंद्रे व तेथे आवश्यक सुविधा, भोजन आदिंबाबत खात्री करावी आदि सूचना केल्या.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जावू नये. संभाव्य पूरस्थिती हाताळण्यास जिल्हा प्रशासन सज्ज असून, पालकमंत्री म्हणून आपण परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत आहोत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुरध्वनीद्वारे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे यांच्याकडून कोयना व वारणा धरणातून होणारा विसर्ग, त्यानुरूप नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून घ्यावयाची काळजी याबाबतचा आढावा घेतला. तसेच, पूरस्थितीच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने पाण्याची आवक व विसर्ग याबाबत आलमट्टी धरण व्यवस्थापनाशी योग्य तो समन्वय ठेवावा, असेही सूचित केले.

00000

संबंधित पोस्ट

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात ‘ई-गव्हर्नन्स’ मध्ये तृतीय क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

आपला पैसा आपला अधिकार योजनेचा लाभ घ्यावा- अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta

सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली जिल्हा समृध्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन- सांगली पॅटर्न कृषि परिषद निर्यात सक्षमीकरण कार्यशाळेस उत्कृष्ट प्रतिसाद

फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीनदिवसीय फळ महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

ग्रंथ पूजन करून ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न

नावीन्यपूर्ण विकासकामांतून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहर बनविणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलचितळे रोड येथे नेहरू मार्केट भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न