vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

ठाणे सीजीएसटी अधिकाऱ्यांनी 47.32 कोटी रुपयांच्या बनावट आयटीसी फसवणुकीचा लावला छडा ; मुख्य सूत्रधाराला केली अटक

ठाणे  सीजीएसटी अधिकाऱ्यांनी 47.32 कोटी रुपयांच्या बनावट आयटीसी फसवणुकीचा लावला छडा ; मुख्य सूत्रधाराला केली अटक..

ठाणे प्रतिनिधी -ठाणे  सीजीएसटी अधिकाऱ्यांनी 47.32 कोटी रुपयांच्या बनावट आयटीसी फसवणुकीचा लावला छडा ; मुख्य सूत्रधाराला केली अटक

सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालयाच्या कर- चुकवेगिरी विरोधी शाखेने सुमारे 47.32 कोटी रुपयांच्या बनावट दाव्यांचा समावेश असलेली बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची मोठी फसवणूक उघडकीस आणली आहे.

अंतर्गत विकसित गुप्तचर विभाग आणि प्रगत डेटा विश्लेषण साधनांद्वारे हे प्रकरण उघडकीस आले. तपासात आढळून आले की विवेक राजेश मौर्य द्वारे संचालित मेसर्स केएसएम एंटरप्रायझेसने वस्तू किंवा सेवांचा कुठलाही प्रत्यक्ष पुरवठा न करता फसवणूक करून स्वतः आयटीसीचा लाभ मिळवला आणि वळवला. त्याच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात अनेक बँक पासबुक, चेकबुक, अनेक मोबाईल फोन आणि अनेक बनावट कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे यासह गुन्हे सिद्ध करणारे पुरावे जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान, मौर्य याने फसवणूकीचा सूत्रधार असल्याचे, कमिशन मिळवल्याचे आणि बेकायदेशीर व्यवहारांचा थेट लाभ उचलल्याचे कबूल केले. त्याला 19 ऑगस्ट 2025 रोजी अटक करण्यात आली आणि ठाणे येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता त्यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

संबंधित पोस्ट

गोदाम बांधकाम व मिनी ऑईल मिलसाठी २२ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी एस.एस.बी. कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयफा २०२५ स्टील महाकुंभचे

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकता असावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर  उपाययोजनांचा प्रामुख्याने समावेश असावा

लघुलेखक (उच्चश्रेणी) लघुलेखक, लघु टंकलेखक पदांकरीता इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी समक्ष कार्यालयात भेट द्यावी

vishwatmaklokswamivarta