vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारीजिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी..

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारीजिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी..

     अमरावती, प्रतिनिधी ‘उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत अमरावती जिल्ह्यात रविवार, दि. 21 सप्टेंबर रोजी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLANT) परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या निरक्षर व्यक्तींनी आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

    या परीक्षेचा मुख्य उद्देश १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या निरक्षर व्यक्तींना मूलभूत साक्षरता कौशल्ये प्रदान करणे हा आहे. यात वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्ये तपासली जातील. केंद्र शासनाच्या ‘उल्लास’ या कार्यक्रमाअंतर्गत ही परीक्षा घेण्यात येत आहे, ज्यामध्ये निरक्षर व्यक्तींना केवळ साक्षर बनवणेच नाही तर त्यांना जीवनोपयोगी कौशल्ये, जसे की आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता आणि आरोग्यविषयक माहिती देणे हे देखील समाविष्ट आहे.

    परीक्षेसाठी, उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच, ओळखपत्र म्हणून मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुक यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्र हे त्याच शाळेत असेल जिथे उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार असून, दिव्यांगांसाठी 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तामिळ, बंगाली आणि उर्दू या माध्यमांमध्ये देता येईल. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र दिले जाईल.

*****

संबंधित पोस्ट

सुपा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

देशविघातक कारवायांप्रकरणी साकीब नाचनच्या घरासह बोरिवलीतील संशयितांवर NIAचे छापे; लॅपटॉप, मोबाईल व अन्य साहित्य जप्त. साकीब सध्या तिहार तुरुंगात.

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी31 डिसेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाचे गुरुवारी उद्घाटन*मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta