vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवस फुले शाहू आंबेडकरी जलसा आयोजनसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजनदिनांक १९ व २० सप्टेंबर रोजी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा शासनाच्या वतीने संगीतमय जागर…

छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवस फुले शाहू आंबेडकरी जलसा आयोजनसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजनदिनांक १९ व २० सप्टेंबर रोजी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा शासनाच्या वतीने संगीतमय जागर…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व भक्ती परपंराचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला सामाजिक उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजसुधारणा कार्याची महती, त्यांचा विचारांचा प्रसार करणाऱ्या शाहिरी, कवना, सत्यशोधकी जलशांची परंपरा जपणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, तसेच समाज प्रबोधनात्मक गीतांचा समावेश असणारा फुले शाहू आंबेडकरी जलसा हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली १९ व २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत तापडिया नाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीर देवानंद माळी, शाहीर राजा कांबळे, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, विजय सरतापे, ख्यातनाम गायिका रागिणी बोदडे, सरला वानखेडे, सपना खरात, चेतन कुमार चोपडे, रामलिंग जाधव यांच्या सुमधुर गितांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजनगर येथे होऊ घातलेल्या या फुले-शाहू-आंबेडकरी कार्यक्रमात सहभागी कलाकाराचा जागर करणाऱ्या कलापथकाचा, शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित’छावा’ चित्रपटा चे दमदार प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी  झालेआई-बाबा…

वेव्हज 2025- भारत सरकारच्या वतीने आयोजित पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद

 संवाद तर्फे माहीम मध्ये संगीतोपचार म्युझिक थेरेपी ज्येष्ठांसाठी कार्यक्रम संपन्न

झी स्टुडिओज् प्रस्तुत ‘आता थांबायचं नाय!’ चे दमदार टायटल पोस्टर लाँच!

vishwatmaklokswamivarta

बहुचर्चित उदयपूर फाइल्स चित्रपट आज प्रदर्शित होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाने घातली बंदी..