vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये बौद्ध भंते विमान्सा यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र* *निषेध ~ राज्यमंत्री रामदास आठवले* 

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये बौद्ध भंते विमान्सा यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र* *निषेध ~ राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी- मुंबई विद्यापीठात पाली विभागाला अनुदानीत करण्यात यावे तसेच पाली भाषा विभागाची स्वतंत्र इमारत मुंबई विद्यापीठातर्फे देण्यात यावी या मागणी करीता भंदत विमान्सा यांनी विद्यापीठाच्या कालीना कॅपस येथे उपोषण सुरु केले होते.केंद्रीय मंत्री किरण रिजिजु हे विद्यापीठात आले असता त्यांना शांतपणे निवेदन देण्याकरीत भंदत विमांसा पुढे आले असता विद्यापीठाच्या सुरक्षारक्षांनी भंतेंना धक्काबयकी करुन त्यांचे चिवर फाडण्यात आले. भंते विमान्सा यांना मारहाण करण्यात आली.भंतेंजींवर चुकीचा एफआरआय दाखल करण्यात आला.या सगळ्यांविरोधात भंतेजींनी विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज भेट देवून आपले समर्थन दिले.भंतेंना झालेल्या मारहाण प्रकरणाचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांवर एफआरआय दाखल करण्यात यावे. याबाबत मुंबई विद्यापीठ प्रशासनाला आणि पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या प्रकरणी रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध मोर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

                         गेले 33 दिवस मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅपसच्या प्रवेशद्वारावर पाली विभागाला अनुदानीत करण्यात यावे त्याला स्वतंत्र दर्जा मिळावा व त्यांचे कामकाज चालविण्यासाठी स्वतंत्र इमारत देण्यात यावी,मुंबई विद्यापीठाच्या वस्तीगृहात अनुसुचित जाती जमातीच्या विभागासाठी राखीव जागा ठरवण्यात यावी या मागणीसाठी भदंत विमांसा 14 ऑगस्ट 2025 रोजी पासुन मुंबई विद्यापीठात उपोषणाला बसले होते.केंद्रीय मंत्री रिजीजु यांना निवेदन देण्याकरीता गेलेल्या भंतेंना विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांकडुन मारहाण करण्यात आली.या मारहाणीत भंते विवस्त्र झाले होते.ते काही दिवस हॉस्पीटलला दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांना हॉस्पीटलातुन डिस्चार्ज मिळाला होता.बाहेर येऊन भांतेंनी आपली आंदोलन तसेच सुरु ठेवण्याचे ठरविले होते.

दरम्यान आरपीआय तर्फे मुंबई विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलनाची हाक दिली आह, मुंबई विद्यापीठ प्रशासनाने भंतेवर अत्याचार करणाऱया सुरक्षारक्षकांवर त्वरित एफआयआर दाखल करुन त्यांना विद्यापीठातुन बरखास्त करण्यात यावे,भंतेंजींनी केलेल्या मागण्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करण्यात यावी. भंते विमांसा यांच्यावर दाखल झालेला चुकीचा गुन्हा रद्द करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षा तर्फे करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनआणखी तिव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला5आहे.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गातम सोनावणे,मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे,अमित तांबे,श्रावण मोरे,शशीकला जाधव ,श्याम निकम विद्यार्थी परिषदेचे नेते चंद्रशेखर कांबळे; सचिन बनसोडे आदी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मान्यंवर उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी आरटीओ पुणे येथे अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

vishwatmaklokswamivarta

हैदराबाद विमानतळावर सीआयएसएफची मोठी कारवाई …अबू धाबीहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ₹1.4 कोटी किमतीच्या अघोषित इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त — ड्रोन, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक वस्तूंचा समावेश.

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,अनधिकृत पाणी उपसा केल्यास वीजपुरवठा खंडित करा,पाणीसाठा आरक्षण व कृषी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका; एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर