vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकर्‍यांच्या प्रश्नी शिवसेनेचा आवाज दणाणला…शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त करून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत द्या –जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

शेतकर्‍यांच्या प्रश्नी शिवसेनेचा आवाज दणाणला…शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त करून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत द्या –जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

जालना, (प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची संपूर्णकर्जमुक्ती करून अतिवृष्टीग्रस्ताना भरीव मदत देण्याची मागणी जालनाजिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुखभास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वातीलशिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी तीव्र निदर्शने करीत जिल्हाधिकारीकार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय दणाणून सोडले.या शिष्टमंडळात जिल्हासंघटक भानुदास घुगे,उपजिल्हाप्रमुख भगवानरावकदम,मुरलीधर शेजूळ,माजी सभापती मुरलीधर थेटे, तालुकाप्रमुख हरिहरशिंदे,जयप्रकाश चव्हाण, माजी जिप सदस्य बबनराव खरात, शहरप्रमुख बालापरदेशी, घनशाम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, प्रभाकर उगले, बाबुरावकायंदे आदींचा समावेश होता. यावेळी निवेदन करतांना जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले की, मागील काही दिवसात जालना जिल्ह्यातील सर्वच मंडळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. शेतकर्‍यांची सोयाबीन,कपाशी, तूर, फळबाग आदी पिके पूर्णतः हातची गेली. अगोदरच पेरणी-मशागतीसाठीशेतकर्‍यांनी सरकारी, खाजगी बँका व इतर मार्गाने कर्ज काढून केलेला खर्चपूर्णतः वाया गेला आहे. अशा अडचणीतील शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठीसरकारने अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते परंतुविरोधी पक्षाच्या व संघटनांच्या दबावामुळे सरकारने मंगळवारी नुकतीचमदतीची घोषणा केली. सरकारने घोषित केलेली मदत ही अतिशय तुटपुंज्या,स्वरुपाची आहे. मराठवाड्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना भरीव मदत मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.तर पक्षाच्या वतीने पुढील प्रमाणे मागण्या यावेळी जिल्हाधिकारीयांच्याकडे करण्यात आल्या. जिल्ह्यासह राज्यातील सर्वच शेतकर्‍यांनासरसगट कर्जमुक्त करण्यात यावे, सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफकरण्यात यावे, शेतकर्‍यांना मिळणारी मदत सरसकट असावी जेवढे खातेदार असतीलत्या सर्वांना मदत मिळावी कोणीही वंचित राहू नये, अतिवृष्टी व पुरानेवाहून गेलेल्या जनावरांचा पोस्टमार्टम रिपोर्ट देणे अशक्य असल्यामुळे सदर,जाचक अट रद्द करावी, नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याने जाहीर प्रतीहेक्टरी १७ हजार व २७ हजार ही मदत वाढवून प्रती हेक्टरी ५० हजार रुपयेकरण्यात यावी, शहरी भागातही अनेक वस्त्यांत पाणी घुसले तेथील घरांची पडझड झाली त्यांनाही मदत देण्यात यावी, मदतीत फळबागांचा उल्लेख नाही त्यांनाप्रती हेक्टरी एक लाख रुपये या प्रमाणे मदत करण्यात यावी.अतिवृष्टीने रस्त्यांचे ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असूनत्यांची ही दुरुस्ती करण्यात यावी. पिक विम्याचे निकष शिथिल करून त्वरितशेतकर्‍यांना लाभ देण्यात यावा, छोटे-मोठे तळे बंधारे फुटल्यामुळेत्यांच्या दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अद्यापही अनेकमंडळातील अतिवृष्टीचे पंचनामे झालेले नाहीत ही प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असून सदरील पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे, पर्जन्यमापकयंत्र खराब असल्याने अतिवृष्टीची काही मंडळात नोंद झालेली नाही, तेथेहीअतिवृष्टी गृहीत धरून मदत करण्यात यावी, जालना तालुक्यातील पाथ्रुड येथीलधरण फुटून मृत्यू पावलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिकमदत देण्यात यावी अशा विविध मागण्या जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यातआल्या.

यावेळी विभागप्रमुख प्रभाकर घडलिंग, ज्ञानेश्वर गोरे, जनार्दन गिराम,बळीराम ढवळे, विष्णुपंत गिराम, विठ्ठल पडूळ, सुदाम काळे, बाबासाहेबपाखरे,सुरेश वाघमारे, अर्जुन शेवाळे, राजु वैद्य, संजय जाधव, विठ्ठलपाउलबुद्धे, संजय गिराम, रमेश गिराम, जीवन खंडागळे, सखावत पठाण, बबनरावमिसाळ, परमेश्वर म्हात्रे, नागोजी थेटे, शेषराव लहाने, किसन राठोड, अरुणडोंगरे, अजय रोडीया, प्रभाकर खरात, संतोष क्षत्रिय, कैलास मिसाळ सुभाषपितांबरे, सुभाष काटकर, अनिस पठाण, सोनाजी खांडेभराड, रमेश तुंगेवार,विकास बोर्डे, तुकाराम भुतेकर, रामेश्वर कुरील, संदीप मगर यांच्यासह आदी पदाधिकार्‍यांचे उपस्थिती होती

०००००

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

vishwatmaklokswamivarta

कोकणातील प्रगतशील शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री साधणार संवाद

vishwatmaklokswamivarta

रेवदंडा-साळाव पुलावरून २० टनांवरील अवजड वाहतुकीस बंदी-पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला साजेशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये १५ ते १९ दरम्यान स्पर्धेचे आयोजन

शांतता समितीची सभा; बकरी ईद सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील• गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी• जनावरांची वाहतूकीपुर्वी स्वास्थ्य तपासणी करून प्रमाणपत्र द्यावे..