vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी मुलचेरात शेतीच्या बांधावर : नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व निवासी पट्टे वितरण

जिल्हाधिकारी मुलचेरात शेतीच्या बांधावर : नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व निवासी पट्टे वितरण

गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकतेच थेट मुलचेरा तालुक्यात दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची स्थिती आणि नुकसानाची सविस्तर माहिती घेतली आणि मदत व पुनर्वसन उपाययोजनांबाबत चर्चा केली.

या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम. व तहसीलदार चेतन पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध गावांतील शेतकऱ्यांना भेटून शेतीतील परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे पूर्ण करून शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

सेवा पंधरवड्या अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या अभियानात जिल्हाधिकारी यांनी सन २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील घरांना नियमित करण्याच्या प्रक्रियेत मुलचेरा तालुक्यातील निवडक १० लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमनाखाली पट्टे वाटप केले. तालुक्यात ६७ लाभार्थ्यांना निवासी पट्टे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार पाटील यांनी यावेळी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध विकासकामांची सखोल पाहणी केली. त्यांनी मंडळ अधिकारी, तलाठी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन महसूल व सेवा पंधरवडा उपक्रमांची प्रगती तपासली. याशिवाय शासकीय आश्रम शाळा, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद शाळा विवेकानंदपूर तसेच एकलव्य मॉडेल स्कूल येथे भेट देवून पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.

000

संबंधित पोस्ट

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान;दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी अमित शाह, राजनाथसिंह, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, नीती आयोगात भेट

नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

शहीद जवानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव