vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वाचन प्रेरणा दिवस,वाचक हेच वाचन संस्कृतीचे रक्षक- डॉ. मिलिंद दुसाने

वाचन प्रेरणा दिवस,वाचक हेच वाचन संस्कृतीचे रक्षक- डॉ. मिलिंद दुसाने

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-वाचन संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी वाचक म्हणून आपली आहे. शासनाच्या वतीने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम, ज्ञान, साहित्य निर्मितीचे उपक्रम राबविले जात आहेत. वाचक म्हणून शासनाच्या या प्रयत्नांना आपली साथ असणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी आज केले.

 शासकीय विभागीय ग्रंथालयात आज माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व वाचकांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमास सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, ग्रंथालय भारतीचे अध्यक्ष डॉ. रा. शं, बालेकर, विक्रमशिला कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्य श्रीमती अर्चना साळवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, सुभाष साबळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह गुलाबराव मगर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन व वाचकांचा सत्कार करण्यात आला.  डॉ. दुसाने यांनी सांगितले की, डिजीटल वाचन आणि ग्रंथ वाचन या प्रक्रियेचा मानवी मेंदूवर होणारा परिणाम अभ्यासणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्राचा वापर करतांना आपली भावी पिढी ग्रंथ वाचनापासून दूर जाणार नाही याची काळजी आपण घेणे आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक संतोष जाधव यांनी तर आभार प्रदर्शन अनिल बाविस्कर यांनी केले.कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

बुलढाण्यात उद्यापासून ‘राजमाता महोत्सव’१५० स्टॅाल्सद्वारे प्रदर्शन व विक्री ; खाद्यपदार्थांची मेजवाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा-डॉ. नीलम गोऱ्हे

पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) दि.10 ते 14 जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना…

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची बीज भांडवल कर्ज योजना; अर्ज मागविले

पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

बीआयएस’च्यावतीने मुंबईत जागतिक मानक दिनानिमित्त ‘मानक महोत्सव’ साजरा

vishwatmaklokswamivarta