vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

जाहीरात विषयक जाहीर आवाहन

जाहीरात विषयक जाहीर आवाहन

 राज्य प्रतिनिधी-     महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचेकडील दिनांक 09 मे, 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र महानगरपालिका [आकाश-चिन्हे (स्काय-साईन) जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण] नियम, 2022 बृहन्मुंबई महापालिका वगळून सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांना लागू करण्यात आलेले आहेत.

  महापालिका क्षेत्रात कोणतीही जाहिरात प्रसिध्द करावयाची असल्यास, त्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम 244, 245 व महाराष्ट्र महानगरपालिका [आकाश-चिन्हे (स्काय-साईन) जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण] नियम-2022 नुसार मा. महापालिका आयुक्त यांची आगाऊ लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

    जाहिरात म्हणजे कोणतीही खाजगी/ सार्वजनिक / राज्य सरकार / केंद्र सरकार / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / शासकीय कंपन्या / शासकीय प्राधिकरणे इत्यादींची जमीन/इमारतीच्या सभोवतालच्या जागा / गच्ची / प्रकारावर / बांधकामे यावर कोणतीही साधने किंवा कोणत्याही रीतीने मांडलेले जसे, उद्घोषणा किंवा निर्देश, हे जसे की, शब्द, अक्षर, नमूना (Model), भित्ती पत्रके, जाहिरात फलक, कापडी-फलक, तात्पुरत्या कमानी, प्रकाशित चिन्हे, नामफलक, दिशादर्शक फलक, आकाशचिन्ह, प्लाकार्ड, डिजिटल बोर्ड, एलईडी, एलसीडी, बॅकलिट बोर्ड, निऑन बोर्ड डिसप्ले, ईलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, व्हिडीयो डिस्प्ले, लेझर शो / देखावा, फूगे इ. ह्यामधील कोणत्याही प्रकारच्या साधनांनी, किंवा माध्यमांद्वारे ग्राहकांना आकर्षित करुन किंवा माहिती देऊन व्यावसायिक फायद्याकरिता किंवा प्रसिध्दीकरिता, कोणत्याही रस्त्यावरुन, मार्गावरुन दिसेल अशा रीतीने मांडलेले निवेदन किंवा प्रदर्शित केलेली कोणतीही कृती यांचा त्यात समावेश होतो. अशा जाहिराती प्रदर्शित करण्याकरीता उक्त नियमातील तरतूदीनुसार कागदपत्रांच्या पुर्ततेसह आवश्यक जाहिरात शुल्काचा भरणा करून नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी घेणे संबंधित जाहिरातदार यांना बंधनकारक आहे.

   त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जाहिरात होर्डिंग्ज, नामफलक, निऑन साईन आणि ग्लोसाइन बोर्ड यांचे सर्वेक्षण करून मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे माहिती संकलित करणे, संबंधित जाहिरातदारांना कॉल सेंटरद्वारे जाहिरात परवाना घेणेकरीता मार्गदर्शन करून पाठपुरावा करणे, संबंधित जाहिरातदारांना नोटीस देणे इ. कामे करण्याकरीता मे. ऑरनेट टेक्नोलॉजी प्रा. लि. या खाजगी संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे.

  त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या कामाकरिता महानगरपालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या मे. ऑरनेट टेक्नोलॉजी प्रा. लि. या संस्थेच्या प्रतिनिधीस सहकार्य करावे, जेणेकरून संबंधित सर्व जाहिरात होर्डिंग्ज, नामफलक, निऑन साईन आणि ग्लोसाइन बोर्डचे सर्वेक्षण करणे शक्य होईल.

      त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची जाहिरात प्रदर्शित करण्याकरिता महाराष्ट्र महानगरपालिका [आकाश-चिन्हे (स्काय-साईन) जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण] नियम, 2022 मधील तरतूदींनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://app.nmmconline.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने विहीत कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज करावा व तद्नंतर आवश्यक जाहिरात शुल्काचा भरणा करून जाहिरात परवाना प्राप्त करून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थविरोधी ठाणे; जिल्हा प्रशासनाने केला संकल्पअंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी सर्वांना प्रेरणा देण्याचा जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी

vishwatmaklokswamivarta

भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाला मिळणार गती;ठाणे- भिवंडी-कल्याण भूमीगत मेट्रोसह नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग आढावा बैठक

स्वीप समितीच्या वतीने ‘मनपा ऑन एअर’ उपक्रम-विविध रेडिओ वाहिन्यांवरून प्रेरक मुलाखती व संदेश प्रसारित…

vishwatmaklokswamivarta

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर· १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या सेवा नागरिकांना व्हॉट्सॲपवरही उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे येथे गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप