vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

महादेवा फुटबॉल योजना: लिओनेल मेस्सीसोबत खेळण्याची संधी

महादेवा फुटबॉल योजना: लिओनेल मेस्सीसोबत खेळण्याची संधी

       अमरावती, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मेशन, सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने महादेवा ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेचा भाग म्हणून राज्यातील 13 वर्षांखालील मुले, मुलींसाठी (जन्मतारीख दि. 01.01.2012 ते 31.12.2013) जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निवडचाचणीतून निवड होणाऱ्या खेळाडूंना 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. तरी सदर निवड चाचणीस्थळी येण्यापूर्वी यासोबत जोडलेल्या गुगल

    लिंकद्वार(https://forms.gle/ctCMRZ4FZDxwYEvA7) नोंदणी करावी. आपल्या शाळा, संस्थेतील जास्तीत जास्त फुटबॉल खेळाडूंना सहभागी होण्यास प्रोत्साहित करून फुटबॉल या खेळात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अंतिम निवड झालेल्या खेळाडूंना राज्यशासनातर्फे प्रोत्साहन म्हणून 5 वर्ष स्कॉलरशिप, निवासी प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हास्तर निवड चाचणी स्थळ हे पोलिस ग्राउंड, पोलिस पेट्रोल पंप मागे, अमरावती आहे. चाचणी दिनांक दि. 29 ऑक्टोबर 2025, सकाळी 9.30 वाजता राहील. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड व जन्माचा दाखला सोबत आणावा. अधिक माहितीसाठी अमरावती जिल्हा फुटबॉल संघटना सचिव सुशिल सुर्वे (मो. 7875652527) यावर संपर्क साधावा,. जास्तीत -जास्त खेळाडूंनी उपस्थित राहण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

मुंबईत फिट इंडिया – संडेज ऑन सायकल उपक्रमाची 75 वी आवृत्ती साजरी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या भारतातील आयोजन

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित  सुरक्षा मंत्र: आधुनिक जगात एक पाऊल पुढे कार्यशाळेस  विद्यार्थीनी व महिलांचा उत्स्फुत प्रतिसाद

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडूंनी निवड चाचणीसाठी 9 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर- रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड होणार

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संडे ऑन सायकल फिटनेस का डोस या आधा घंटा रोज सायकल रॅलीचे आयोजन

शुभांगी संतोष घुले हिचे अमेरिका येथील अल्बामा येथे 21 व्या जागतिक अग्निशमन आणि पोलिस स्पर्धेमध्ये कांस्य पदक:

vishwatmaklokswamivarta