vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

     *रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी):-* नजिकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम बाबत निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच कामाला लागावे, आपापसात समन्वय राखून सर्वांनी एकदिलाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी पोलीस यंत्रणांसह विविध शासकीय यंत्रणांची दूरदृश्यप्रणालीद्वारे पूर्वतयारी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते

    यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ.रविंद्र शेळके, जिल्ह्यातील व नवी मुंबई परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक, प्रांताधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी सूचना दिल्या की, निवडणुकीच्या आवश्यकतेप्रमाणे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या दृष्टीने सर्व विभागांनी मनुष्यबळाचा डाटाबेस तयार करावा. सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागावे. संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र मतदारांसाठी सोयीस्कर असेल, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक सर्व सोयीसुविधा व्यवस्थित असतील, अपंग मतदारांसाठीची व्यवस्था अत्यंत चोख असेल, याची वैयक्तिक खात्री करावी. सर्व मतदान केंद्र स्वतः तपासावीत. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक सर्व कार्यवाही आणि कारवाया तात्काळ कराव्यात. नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात राहावे.

00000

संबंधित पोस्ट

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यात नागपूरसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात तीव्र उष्णता कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला 

रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा महाड येथे 3 नोव्हेंबर रोजी होणार.. 

vishwatmaklokswamivarta

रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.-  सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ