vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना

रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना

 

    अमरावती, प्रतिनिधी : रस्ते अपघातातील रुग्णांना दीड लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. अपघातग्रस्तांना मदत होण्यासाठी आवश्यक सुविधा असणाऱ्या रुग्णालयांनी या योजनेत अंगीकृत करण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

    केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना’ राबविण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालयांचे अंगिकरण करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहेत. जिल्ह्यामधील ‘ॲक्सिडेंट हॉटस्पॉट’च्या यादीनुसार पात्र रुग्णालये शोधून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने यादी अंतिम करण्यात येणार आहे.

      जिल्ह्यात रस्ते अपघातात मदतीसाठी रुग्णालय अंगीकृत करण्यात येत आहेत. रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी विशेषज्ञ सेवा असणे आवश्यक आहे. रुग्णालयात ट्रामा, पॉली ट्रामा, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, क्रिटिकल केअर ही सुविधा असणे आवश्यक आहे. ही सुविधा असलेल्या रुग्णालयांना या योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक रुग्णालयांनी hem2.0 या प्रणालीवर अर्ज करावा लागणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी डॉ. अंकिता मटाले, जिल्हा समन्वयक, 8275095802 आणि डॉ. अविनाश मरकड, 9967134252 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी औषधोपचार मोहिमेला सहकार्य करा – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

इटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विशेष मुलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत शेलगाव आटोळ येथे महिलांची आरोग्य तपासणी

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर – २४३ जणांची तपासणी

ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ‘मच्छर ला टक्कर’ अभियानाची सुरुवात कीटकजन्य आजारांविरोधात भव्य जनजागृती चित्ररथ मोहीम

vishwatmaklokswamivarta