vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत ४ हजार ७४० नागरिकांना घरपोच दाखले देण्यात यश

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत ४ हजार ७४० नागरिकांना घरपोच दाखले देण्यात यश

ठाणे प्रतिनिधी– १५० दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत सामान्य नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारातच सहज, सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘Door Step Delivery’ या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध सेवा मिळत आहेत.

  या प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या ४०२ प्रकारच्या शासकीय सेवा मिळू शकतात. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ५ हजार ११२ अर्ज आलेले असून, ४ हजार ७४० नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे. उर्वरित १३८ अपॉईंटमेंटवर काम सुरू असल्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.

या उपक्रमामार्फत मिळणाऱ्या प्रमुख सेवा व विभाग:    मृत्यू दाखला, जन्म दाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला, ग्रामपंचायतीचा येणे बाकी नसल्याचा दाखला, विवाह नोंदणी दाखला, नमुना नं ८ चा दाखला (मालमत्ता फेरफार), निराधार योजनेसाठी वयाचा दाखला हे सर्व लोकहक्क सेवा आयोगांतर्गत येणारे हे सात दाखले ‘Door Step Delivery’ मार्फत देण्यात येत असून त्या व्यतिरिक्त इतर विभागाचे जसे जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उद्योग आधार, जीवन प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज, पॅनकार्ड व दुरुस्ती, पासपोर्टसाठी शपथपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शेत मोजणी अर्ज, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, राजपत्र प्रकाशन, १५ वर्षाचे रहवासी प्रमाणपत्र, खाद्य परवाना जीवन प्रमाणपत्र, हयात प्रमाणपत्र, आभाकार्ड (आयुष्यमान भारत आरोग्य खाते), शेत मोजणी अर्ज / Farm Measurement Application, डिश टीव्ही डिटीएच रीचार्ज, शिष्यवृत्ती अर्ज (Scholarship Application), केंद्र सरकार ओबीसी प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, GST Form, Hotel Licence, टीकीट आरक्षण, निवासी शाळा, परदेशी शिष्यवृति, शासकीय वसतिगृह प्रवेश, अर्थ कुटुंब सहाय्य, नविन कौटुंबिक शिधापत्रिका, महाभरती, नोकरीसाठी नोंदणी (रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय), भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्रासाठी अर्ज अशा ४०२ सेवा तर महसूल विभाग, पोलीस/गृह विभाग, भूमि अभिलेख विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, समाज कल्याण व सामाजिक न्याय विभाग, शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, डिजिटल जीवन प्रमाण, आयकर विभाग, पासपोर्ट-परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, आरोग्य विभाग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय, जिल्हा परिषद अशा प्रशासकिय ८० विभागातील ‘Door Step Delivery’ या प्रणालीद्वारे घरपोच सेवा मिळू शकतात.   ग्रामपंचायतींच्या कार्यरत केंद्रचालक यांना ही जबाबदारी दिली असून यासाठी आपले सरकार सेवा केंद्र मधील केंद्रचालक यांच्यामार्फत कार्यान्वित आहेत. केंद्रचालक नागरिकांकडून वेळ ठरवून त्यांच्या घरी येतात, आवश्यक कागदपत्र स्कॅन करतात आणि ऑनलाइन सेवा प्रक्रिया पूर्ण करतात. सेवा मंजूर झाल्यावर संबंधित प्रमाणपत्र पुन्हा घरपोच पोचवले जाते.अपॉईंटमेंट व मदतीसाठी तसेच अधिक माहितीसाठी:नागरिकांनी https://thanedoorstep.in/ या संकेतस्थळावरून अपॉईंटमेंट घ्यावी किंवा मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक ८३८०८२२३३३ वर संपर्क साधावा.ठाणे जिल्हा परिषदेच्या ‘Door Step Delivery’ उपक्रमामुळे आम्हा गावकऱ्यांना खरोखरच मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रचालक थेट घरी येतात, कागदपत्रे स्कॅन करून लगेच प्रक्रिया सुरू करतात. सेवा घरबसल्या मिळाल्याने शासन खऱ्या अर्थाने आमच्या दारी आले आहे, अशी भावना प्रत्येक नागरिकात निर्माण झाली आहे.- ग्रामस्थ कोरावळे, मुरबाड रेश्मा शिंगोळे     “नागरिकांनी आपल्या सोयीसाठी या अभिनव उपक्रमाचा लाभ घ्यावा, घरच्या घरी प्रमाणपत्रे व शासकीय सेवा मिळवून वेळ आणि खर्चाची बचत करावी,” असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

मुंबई येथे 30 जून रोजी डाक अदालत

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज- सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू

प्रशासनाने स्वत:हून व वेळेवर केलेल्या कारवाईमुळे राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणी रोखली गेली”

vishwatmaklokswamivarta

सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा, लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा: संभाजी भिडे काय म्हणाले ते पहा..

vishwatmaklokswamivarta

दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात…

vishwatmaklokswamivarta

अल-निनोच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाच्या गावोगावी 13 हजार गाव बैठकांचे आयोजन