vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी काळा किल्ला येथे संत रोहिदास पुण्यतिथी व किर्तन सप्ताह दीप महोत्सव संपन्न

धारावी काळा किल्ला येथे संत रोहिदास पुण्यतिथी व किर्तन सप्ताह दीप महोत्सव संपन्न

मुंबई प्रतिनिधी -संत रोहिदास सेवा मंडळ विठ्ठल रुक्माई मंदिर धारावी काळा किल्ला येथे प्रमुख कार्यकर्ते श्री गणेश खाडे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने दिनांक 27 नोव्हेंबर 28 नोव्हेंबर या कालावधीत संत रोहिदास पुण्यतिथी व किर्तन सप्ताह दीप महोत्सव नुकताच संपन्न झाला त्यानिमित्त दिनांक 21 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधी भजन कीर्तन पारायण वाचन प्रवचन यासारखे जनजागृती व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ह भ प शेळके महाराज शिवाजी भगत महाराज आणि काल्याचे किर्तनकार ह भ प महादेव महाराज यांनी प्रवचनकार कीर्तनकार यांच्या माध्यमातून सप्ताह भरात लोकांचे प्रबोधन केले या कार्यक्रमादरम्यान दिनांक 27 नोव्हेंबर रोजी माननीय श्री अनिल देसाई खासदार यांनी कार्यक्रम स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन श्री विठ्ठल रुक्माई संत रोहिदास महाराज यांचे दर्शन घेऊन उपस्थिती नोंदविली त्यावेळी मा नगरसेवक श्री वसंत नकाशे विठ्ठल पवार शंकर बळी साप्ताहिक धगधगते मुंबईचे संपादक भीमराव धूळप हे उपस्थित होते संत रोहिदास पुण्यतिथी व सप्ताह आयोजक श्री खाडे यांना धन्यवाद दिले

दीपोत्सव समारोप व सामूहिक भंडारा पालखी मिरवणूक आणि वारकरी सहभागातून एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मा श्री बाबुराव माने माजी आमदार पत्रकार श्री संजय शिंदे वृत्तपत्र लेखक सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप गाडेकर व सुनील पवार यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष जमिनीवर बसून सामूहिक भंडारा मोजण्याचा लाभ घेऊन आयोजकांना धन्यवाद दिले यावेळी सर्व कीर्तनकार व प्रवचनकार मंडळी यांचा सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये श्री रामदास वेताळ श्री अविनाश खाडे आत्माराम माने अरविंद खाडे मच्छिंद्र बागडे शैलेंद्र सोनवणे देविदास खाडे या मंडळी सह प्रमुख म्हणून श्री गणेश खाडे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला या भंडारचा लाभ हजारो भाविकांनी घेतला

संबंधित पोस्ट

बातमी प्रसिद्धीचा राग मनात धरुन पत्रकार विष्णु कदम यास मारहाण करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीसीएमची मागणी

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा प्रशिक्षण १० ऑगस्टपासून 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार-2023-24 प्राथमिक छाननी अहवालात,केलेल्या पुरस्कार गुणांकनाबाबत आक्षेप किंवा सूचना 18 फेब्रुवारी पर्यंत सादर कराव्यात

vishwatmaklokswamivarta

दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती…’जिल्हाधिकारी स्वामी यांचे महिला सक्षमीकरण कार्यशाळेत आवाहन

नांदेड विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी 8 उमेदवारांचे 17 नामनिर्देशन अर्ज दाखल