vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रक्ताच्या नात्याने केले ‘निराधार’ पण तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाने दिला आपुलकीचा आधार.!

रक्ताच्या नात्याने केले ‘निराधार’ पण तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाने दिला आपुलकीचा आधार.!

 

चिखली:- प्रतिनिधी मुलगा नको मुलगी पाहिजे जी दोन्हीही परिवाराला आधार देते अस म्हणतात पण एका मुलीने आपल्या वयोवृद्ध जन्मदातीलाच मुलाच्या सहकार्याने जबर मारहाण करून केले घराबाहेर

सविस्तर असे की मूळची जाफराबाद तालुक्यातील असलेली वयस्कर आजी खूप वर्षापासून मेहकर तालुक्यात वास्तव्यात असताना वृद्धपकाळाने पती गेले आणि पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडून मोठ्या शहरात कामानिमित्त व्यस्त झाले.कोणताही आधार नव्हता आणि मग आजी एकटीच इकडे तिकडे भटकंती करत फिरत राहिली.परन्तु आपल्या लोकांची ओढ असल्याने आजी एक दिवस लेकीच्या घरी आली, चिखली तालुक्यात एका गावात ती मुलीकडे आली काही दिवस राहिली परत निघून गेली, परन्तु कुठेही थारा न लागल्यामुळे, कुठेही सहारांना न मिळाल्याने ह्या वयस्कर आजी परत लेकीच्या घरी आली लेक हि आपली सर्व जबाबदारी घेऊन सांभाळ करील याआशेने लेकीच्या घरी आली. मात्र लेकीने मुलाच्या सहकार्याने आजीला जबर मारहाण करून घराबाहेर काढून दिले, नेहमी नेहमी आमच्या घरी काय आहे तुला असे म्हणत धक्के मारून काढून दिले यावर आजीने अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तिच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला निवडणुकीच्या काळ असल्याकारणाने पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा आजीकडे पाठ फिरवली. आता या वयोवृद्ध आजीला कळतं नव्हतं करावं काय, कुठे जावं, कुठे सहारा घ्यावा, आजी भटकंती करत चिखली परिसरात आढळून आली मौजे भोकर येथील सरपंच गजानन फोलाने, श्रीकिसन काळे, भोकरचे तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम फोलाने, उपसरपंच अनंता डोंगरदिवे, संदीप डोंगरदिवे, मुकेश डोंगरदिवे, गौतम डोंगरदिवे यांना त्या आजीने सर्व हकीकत सांगितली त्यावरून त्यांनी त्या आजीला मानव सेवा प्रकल्प अंतर्गत सुरू असलेले तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी प्रवेशित केले आणि अगदी परिवारा सारखे संभाळ करणारे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी या निराधार आजी ला आधार दिला. त्यांच्या या कार्याच्या कौतुक सर्वत्र होत आहे. तसेच वयोवृद्धांना सांभाळण्याचे कोणास जीवावर येत असेल किंवा कोणी असक्षम असेल तर कृपया त्यांना मारहान न करता त्यांना अपमानित न करता मानव सेवा प्रकल्प च्या ८८५५८५०३७८ यावर संपर्क करून निराधार वृद्धांना प्रवेशित करावे असे आवाहन मानवसेवा प्रकल्प च्या वतीने करण्यात आले

संबंधित पोस्ट

आरटीएल’मुळे विद्युत उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिलापूर येथील ‘सीपीआरआय’च्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताहानिमित्त जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर व मेळावा संपन्न

१०० डे ‘ उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार..

प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्या सतर्कतेमुळे-मुरबाड मध्ये दोन बालविवाह थांबवण्यात यश

vishwatmaklokswamivarta

तळागाळातील लोकांना कायद्याच्या माहितीसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आवश्यक – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रजिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक जनजागृती मोहीम

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी भरती12 नोव्हेंबर, 2025 रोजी थेट मुलाखत

vishwatmaklokswamivarta