vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

इस्त्राईलमध्ये नूतनीकरण बांधकाम क्षेत्रात – जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी…

इस्त्राईलमध्ये नूतनीकरण बांधकाम क्षेत्रात – जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी इस्त्राईलमध्ये नूतनीकरण बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अ.मु. पवार यांनी दिली आहे.

विविध कामांसाठी पुढीलप्रमाणे जागा उपलब्ध-प्लॅस्टरिंग काम – 1000 जागा,सिरेमिक टाईल्स लावणी – 1000 जागा, ड्रायवॉल कामगार – 300 जागा,मेसन (गवंडी) – 300 जागा.

शैक्षणिक पात्रता- किमान दहावी उत्तीर्ण, अनुभव – संबंधित कामात किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.कौशल्य , इंग्रजी वाचन, लेखन आणि बोलणे याचे ज्ञान आवश्यक,आंतरिक नूतनीकरण कामात प्राविण्य,जुन्या इमारतींचे दुरुस्ती, संरक्षण व उन्नतीकरण कामाचा अनुभव, वयोमर्यादा 25 ते 50 वर्षे, मानधन (पगार) अंदाजे 1 लाख 62 हजार 500 प्रतिमहिना, कामाचे तास महिन्याला 182 तास, कामाचे दिवस कंपनीनुसार, महिन्यात 21 ते 26 दिवस, निवास व्यवस्था नियोक्त्याकडून, अन्नाची व्यवस्था उमेदवाराने स्वतः करायची आहे. वैद्यकीय विमा नियोक्त्याकडून, अतिरिक्त काम (ओव्हरटाईम) कंपनीच्या नियमांनुसार. करार कालावधी, पहिला व्हिसा वर्षाअखेरपर्यंत; त्यानंतर दरवर्षी नूतनीकरण होऊ शकते. कमाल कालावधी 63 महिने. कामाचे ठिकाण संपूर्ण इस्त्राईल, पोलीस क्लिअरन्स (PCC) अनिवार्य, व्हिसासाठी वैद्यकीय तपासणी उमेदवाराने स्वतः करून घ्यायची. मुलाखत प्रकार प्रत्यक्ष (समोरासमोर).

अधिक माहिती आणि ऑनलाइन नोंदणीसाठी https://maharashtrainternational.com, या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

000000

संबंधित पोस्ट

तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन*18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत

माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन प्रमाणित बियाणे वितरण.

सोने झाले महाग- सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; 91 हजारांवर पोहोचला दर

विशेष भारत-रशिया व्यापार सहकार्याला चालना देणारी उद्योजकांची राऊंडटेबल चर्चा संपन्न

vishwatmaklokswamivarta