vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी – जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्याना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. जिल्हा कीड़ा पुरस्कारातंर्गत ०१ गुणवंत कीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू ०३ (०१ महिला, ०१ पुरुष ०१ दिव्याग खेळाडू) या प्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात येत असून, पुरस्कार्थीना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रुपये १०,०००/- रोख रक्कम देण्यात येते. जिल्हा क्रीडा पुरस्कार करीता खालील निकष पूर्ण करणारे व्यक्ती पात्र ठरतील.

महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. कीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकना करीता या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरण्यात येईल. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व ५ वर्षांपैकी २ वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. एका जिल्हा मध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. एकदा एक खेळामध्ये किंवा प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र राहणार नाही. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय मध्ये नमूद खेळ जिल्हा क्रीडा पुरस्कारा करिता पात्र असतील.

तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू/क्रीडा मार्गदर्शक यांनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे परिपूर्ण अर्ज दित्ताक २५ डिसेंबर २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सदर करावे असे आवाहन श्री नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यानी केलेले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ संपन्न ग्रामस्थांच्या सहभागाने सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबवावे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यात जोरदार पावसाने शेतकरी संकटात

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस माजी अध्यक्ष सोनिया गांधीं यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर केली ‘Poor Lady’ विवादित टिपण्णी; बिहारमध्ये खटला दाखल

vishwatmaklokswamivarta

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमधील आणंद इथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन