vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्‍या प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्‍पादन शुल्‍क खात्‍याचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक संपन्न

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्‍या प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्‍पादन शुल्‍क खात्‍याचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक संपन्न

मुंबई प्रतिनिधी 🔹बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्‍या प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्‍पादन शुल्‍क खात्‍याचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक आज महानगरपालिका मुख्‍यालयात संपन्‍न झाली. बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी हे अध्‍यक्षस्‍थानी होते.

🔹महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्‍त व पारदर्शक वातावरणात व्‍हावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आवश्‍यक दक्षता घ्‍यावी. मतदान केंद्रांची अंतिम यादी तयार करण्‍यापूर्वी मतदान केंद्रांची प्रत्‍यक्ष पाहणी करावी. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नियोजित कालमर्यादेत नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणुकीच्‍या अनुषंगाने विविध पथके कार्यरत ठेवावीत, असे विविध निर्देश श्री. गगराणी यांनी दिले.

🔹आदर्श आचारसंहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस, उत्‍पादन शुल्‍क व इतर विभागामार्फत प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कराव्‍यात. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केल्या जाणाऱया गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांमध्ये विशेष दक्षता घ्यावी. नियमित गस्त, तपासणी नाके, वाहन तपासणी, तसेच संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देशदेखील श्री. गगराणी यांनी यावेळी दिले.

🔹अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार, सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्‍वास शंकरवार, उप आयुक्‍त (सुधार) श्री. संजोग कबरे, उप आयुक्‍त (सामान्‍य प्रशासन) श्री. किेशोर गांधी, उप आयुक्‍त (उद्याने) श्री. अजितकुमार आंबी, कोकण विभागाच्‍या अपर आयुक्‍त श्रीमती फरोघ मुकादम, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी श्री. विजयकुमार सूर्यवंशी यांच्‍यासह २३ निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

ठाणे, पालघरसह कोकणातील धरणांमध्ये मुबलक जलसाठा नद्यांमध्ये विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची 1800 221 251 हेल्पलाईन सुरू’- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई नाही-परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक१५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी