vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रब्बी हंगाम ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपूर्वी नोंदणी करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

रब्बी हंगाम ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपूर्वी नोंदणी करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अकोला सोलापूर प्रतिनिधी : रब्बी हंगाम ई पीक पाहणीची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारी 2026पूर्वी आपल्या पिकांची नोंदणी फोनद्वारे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा निमा यांनी केले आहे

आतापर्यंत अत्यल्प नोंदणी ,ई- पीक पाहणीत शेतक-यांनी स्वत: 7/12 वर पीक पेरा अँड्रॉइड फोनव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेवटची तारीख 24 जानेवारी आहे. अकोला जिल्ह्यात एकूण 3 लक्ष 81 हजार 714 ओनर प्लॉटची संख्या असून, त्यापैकी 12 हजार 753 ओनर प्लॉटची नोंदणी झाली आहे. हे प्रमाण 3.34 टक्के इतकेच आहे.

अकोला जिल्ह्यात डिजिटल क्रॉपसर्व्हेअंतर्गत ई पीक पाहणीची नोंदणी 15 हजार 776.43 हे.क्षेत्रावर रब्बी पिकाची नोंद झाली असून, उर्वरित क्षेत्रावर नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी अॅपद्वारे पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पीक पाहणीची नोंदणी ‘ई पीक पाहणी व्हर्जन 4.0.5’ या मोबाईल अॅपद्वारे होते. ते प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. ई पीक पाहणी अॅपद्वारे शेत बांधावर जावुन पिकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. अडचण आल्यास स्थानिक कर्मचा-यांची मदत घ्यावी

त्यासाठी संबंधित शेतक-याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास अथवा हाताळता येत नसल्यास, संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल तसेच संबंधित गावात नियुक्त केलेले सहायक यांची मदत घेऊन आपल्या पीकांची नोंदणी ई पिक पाहणी अॅप व्दारे करून घेण्यात यावी. सदर अॅप विषयी काही अडचण असल्यास संबंधीत गावाचे ग्राम महसूल अधिकारी तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, आपल्या गावातील डीसीएसकरिता नियुक्त सहाय्यक यांची मदत घ्यावी. ऑनलाईन नोंद केल्यावर 48 तासानंतर त्या नोंदीसह अद्ययावत सातबारा उपलब्ध होईल.

ई पीक पाहणीद्वारे पीकांची नोंदणी न केल्यास आपल्या 7/12 वर पीक पेरा कोरा राहील. त्यामुळे पीक विमा, व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होते. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीबाबत पीक विमा मिळण्यासाठी 7/12 वर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारी 2026 पूर्वी आपल्या पिकांची नोंदणी करून घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय

श्रीनारायण गुरूंच्या महासमाधी शताब्दी उत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन ,श्रीनारायण गुरूंचा एकतेचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की सर्व मानवांमध्ये समान दिव्य तत्व आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू..

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा*- *पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

महाराणा प्रताप सिंहांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राष्ट्रव्यापी विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीच्या आढाव्यासाठी सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश

vishwatmaklokswamivarta