vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

रायगड–अलिबाग, प्रतिनिधी :जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम तसेच टीबी को–मॉर्बिडीटी समन्वय समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालीयावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. अक्षयराज राठोड, डॉ. नालंदा पवनारकर, डॉ. प्रसाद वाईगणकर, डॉ. प्रदीप पोतदार, डॉ. विकास पवार, श्री. संजय माने, श्रीमती रेश्मा संकपाळ यांच्यासह विविध सामाजिक संस्था व कॉर्पोरेट क्षेत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत टीबी मुक्त ग्रामपंचायत उपक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी सिल्वर दर्जा प्राप्त केलेल्या ५६ ग्रामपंचायतींना यंदा गोल्ड दर्जा मिळावा तसेच जास्तीत जास्त ग्रामपंचायती टीबी मुक्त घोषित व्हाव्यात, या दृष्टीने प्रभावी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला

सर्व टीबी रुग्णांची बँक खाती तयार करून प्रत्येक रुग्णाला निक्षय पोषण योजनाचा लाभ देण्यात यावा. एकही रुग्ण या योजनेपासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. टीबी रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या चिप्स व कारटेजेसची कमतरता लक्षात घेता, त्यांची मुबलक उपलब्धता करून देण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्था व कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच अधिकाधिक संस्थांनी निक्षय मित्र म्हणून पुढे येऊन रुग्णांना पोषक आहाराचे फूड बास्केट उपलब्ध करून द्यावेत, ज्यामुळे रुग्ण लवकर बरे होऊन कुटुंब व समाजात टीबीचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.

बैठकीची सविस्तर माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी दिली.

तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये श्रीमती जागृती गुंजाळ, श्रीमती प्रिया नारकर, श्री पंकज पाटील तर कॉर्पोरेट क्षेत्रातून श्री. लहु रोन्दल, श्रीमती नंदिनी मंदेराई, श्री. मंगेश पाटील, श्री. दत्तात्रेय शिंदे, श्री. दंतराव सतीश, श्री. विजय वाघमारे, श्री. किर्तीकांत पाटील, श्री. प्रमोद नाईक आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिन विशेष पोफळेकरांचे ‘सुर्याय नमः’‘पोफळा’ ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम..

एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

येत्या शुक्रवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन 

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम;वृक्ष उत्पादक व खरेदीदार मेळाव्यात ४४९ जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन