vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मानसिक आरोग्य कायद्याचा लाभ रुग्णांना द्या : न्या. जाधव

मानसिक आरोग्य कायद्याचा
लाभ रुग्णांना द्या : न्या. जाधव

लातूर, प्रतिनिधी: ‘मानसिक आजार ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. ‘मानसिक आरोग्य कायदा-2017’ चा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवून त्यांचे हक्क जपले पाहिजेत,’ असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. जाधव यांनी केले.

लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित ‘मानसिक आरोग्य आढावा मंडळाच्या’ बैठकीत ते बोलत होते. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शीतल तळीखेडकर, अशासकीय सदस्य आर. बी. जोशी, आर. एम. क्षीरसागर आणि डॉ. सुधीर बनशेळकीकर उपस्थित होते.

न्या. जाधव म्हणाले, समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. मंडळाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून रुग्णांना न्याय मिळवून द्यावा. यावेळी सदस्य सचिव डॉ. एस. व्ही. ढगे यांनी मंडळाच्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली.

स्वतंत्र कक्षाची स्थापना
आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयात या मंडळासाठी आता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
****

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात

जिल्हा कारागृहात आरोग्य शिबीर संपन्न

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेयांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”आरोग्य व्यवस्था पाहून व्यक्त केले समाधान

जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

आरोग्य विभागाची गरुडझेप : २८ बालकांना थॅलेसिमियामुक्त नवजीवन!जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त ‘एचएलए’ तपासणी शिबिर