vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गंगापूर धरण परिसरात २३ जानेवारी रोजी भारतीय वायू दलातर्फे एअर शोचे आयोजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

गंगापूर धरण परिसरात २३  जानेवारी रोजी भारतीय वायू दलातर्फे एअर शोचे आयोजन-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

नाशिक, प्रतिनिधी : नाशिक फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून भारतीय वायू दलाच्या बिदर येथील 52 स्केड्रॉनच्या सहकार्याने आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून गंगापूर धरण परिसरात 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत सूर्यकिरण एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शोचा नाशिकवासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत,

जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्याला देशसेवेचा मोठा वारसा लाभला आहे. या इतिहासाला उजाळा मिळावा आणि तरुणांमध्ये देशसेवेची भावना निर्माण व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच, नाशिक जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्याची माहिती पर्यटकांना होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येईल.

एअर शोच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी रोजी सराव सत्र होईल. गंगापूर धरण परिसर एअर शोसाठी पूरक आहे. तेथील दृश्यमानता, सुरक्षितता या सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. या शोकरीता तिकिट असणार आहे. त्यासाठी सर्वतोपरी नियोजन करण्यात येत आहे. येथे वाहनतळ, स्टॉल सह विविध पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच पोलिस बॅण्ड पथक असेल. या शोमुळे नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी प्रसाद यांनी व्यक्त केला.

नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी या एअर शो चा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले.

 

०००

संबंधित पोस्ट

महसूल विभागाच्या सर्व सेवा नागरिकांना वेळेत मिळण्यासाठी महसूल यंत्रणेने काम करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला महसूल विभागातील विविध योजनांचा आढावा…

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपली जावी – जिल्हाध्यक्ष, भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

शासनाची संस्थात्मक बांधणी करण्यासाठी काळानुरूप बदल आवश्यक’जनतेला देण्यात येणा-या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

दिल्लीतमहिलासाहित्यसंमेलन ; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल ..

विशेष साहाय्य विभागाच्या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर : मंत्री नरहरी झिरवाळ

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत १६ विद्यार्थी व कुटुंबीयांना लाभ मंजूर