vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हिंद-दी-चादर’ कार्यक्रम जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीचा लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घेतला आढावा* लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मंगळावर, बुधवारी प्रभात फेरीचे आयोजन

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रम जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीचा लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घेतला आढावा* लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मंगळावर, बुधवारी प्रभात फेरीचे आयोजन

लातूर, द प्रतिनिधी : हिंद-दी-चादर गुरु श्री तेग बहादूर साहिबजी यांचा इतिहास सर्व विद्यार्थी व समाजातील नागरिकांपर्यंत पोहचावा, यासाठी शिक्षण विभागामार्फत विशेष उपक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक शनिवारी घेण्यात आली. सर्व आस्थापनांच्या शाळांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितलेहिंद-दी-चादर गुरु श्री तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे भव्य कार्यक्रम राज्यस्तरीय समागम समिती व राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत होत आहे. या अनुषंगाने शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या जनजागृती कार्यक्रमाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीस शिक्षण सहाय्यक संचालक संजय पंचगल्ले, प्राथमिक शिक्षण विभागाचे नोडल अधिकारी संजय पारसेवार, माध्यमिक शिक्षण विभागाचे नोडल अधिकारी मधुकर ढमाले तसेच प्रशासन अधिकारी अशोक कदम व विभाग समन्वयक श्री माधव बाजगिरे हे उपस्थित होते.

राज्य समन्वयक समितीने शिफारस केलेले श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावरील गीत सर्व २ हजार ६६६ शाळा व महाविद्यालयांमध्ये दररोजच्या परिपाठात गाण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. हे गीत सर्व विद्यार्थ्यांना व समाजातील नागरिकांना श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाची ओळख करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे डॉ. मठपती म्हणाले.

याशिवाय, जनजागृती मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधून मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रॅलीद्वारे विद्यार्थी व शिक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ‘हिंद की चादर’ या उपाधीचे महत्त्व व त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतील, असे डॉ. मठपती यांनी सांगितले. या बैठकीला सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन उपस्थिती होती.

**

संबंधित पोस्ट

सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

महिलांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल “इंडियाज गॉट लेटेंट शो” विरुद्ध तक्रार दाखल.

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे शानदार उद्घाटन**मुला मुलींच्या परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या**- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन* 

vishwatmaklokswamivarta

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा – राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

आज 14 ऑक्टोबर पोलीस पाटील पदभरती-2025 लेखी परिक्षेचा  निकाल..लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या 15 ऑक्टोबर होणार मुलाखती

vishwatmaklokswamivarta