vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

लातूर, प्रतिनिधी: रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खत आणि कीटकनाशकांचा पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत. पुणे येथील संचालक (नियंत्रण व गुणनियंत्रण) कृषी आयुक्तालयाच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यात भरारी पथक आणि कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांनी कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान काही केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ८ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत एकूण १७ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. या

मध्ये बियाणे विक्रीचे १३, खत विक्रीचे २ आणि कीटकनाशक विक्रीचे २ परवाने रद्द झाले आहेत.तसेच ८ कृषी निविष्ठा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

साठाफलक व भावफलक प्रदर्शित न करणे, साठा नोंदवही आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत, भावफलक, साठा नोंद अद्ययावत न ठेवणे, विक्री बिलावर शेतकऱ्यांची सही/अंगठा न घेणे, बियाण्यांचा संपूर्ण तपशील बिलात न लिहिणे, उत्पादकाचा स्त्रोत न दर्शविणे, ई-पॉस वरील खत साठा आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत, खतासोबत इतर निविष्ठांची लिंकिंग करणे, परवाना असूनही दुकान बंद ठेवल्यास बियाणे अधिनियम १९६६, नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, कीटकनाशक कायदा १९६८ आणि कीटकनाशक नियम १९७१ नुसार कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांनी स्पष्ट केले.

 

*****

संबंधित पोस्ट

वक्फ वाचवा’ परिषद जालन्यात आज शनिवार*वक्फ कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात इस्लामी विद्वानांचा आवाज*

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व वित्तमंत्री कनूभाई देसाई यांच्या उपस्थितीत डाईंग अँड पेगमेंट्स असोशिएशन अमृत महोत्सव साजरा करणार..

भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींविरोधात सायन-कोळीवाडा येथे हजारो कार्यकर्ते सहभागी …

रिपब्लिकन पक्षाचे साहित्यिकांशी विचारमंथन ~ केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न**-पालकमंत्री शंभूराज देसाई* 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सामान्यांसाठी समर्पित’ ही भावना दाखवली,ध्वजारोहणानंतर ताफ्याला थांबवून जखमी दुचाकीस्वाराला मदत केली

vishwatmaklokswamivarta