vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रिपब्लिकन पक्षाच्या केरळ प्रदेश अध्यक्षपदी नुसरत जहा यांची नियृक्ती – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली अधिकृत घोषणा*

*रिपब्लिकन पक्षाच्या केरळ प्रदेश अध्यक्षपदी नुसरत जहा यांची नियृक्ती – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली अधिकृत घोषणा*

 

मुंबई/कन्नुर प्रतिनिधी – रिपब्लिकन पक्षाच्या केरळ प्रदेश अध्यक्षपदी नुसरत जहा यांची अधिकृत नियुक्ती केल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली. केरळ येथील कन्नुर मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या केरळ राज्य कमिटीच्या पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ना.रामदास आठवले यांनी केरळ रिपब्लिकन पक्षाच्या केरळ राज्य शाखेच्या अध्यक्षपदी नुसरत जहा यांची अधिकृत निवड जाहिर केली.

नुसरत जहा या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत.त्यांनि त्यापुर्वी 2019 ची लोकसभा निवडणुक केरळ मधुन लढवली होती.त्या केरळ मधील रहिवासी आहेत.त्यांचा केरळ मध्ये सर्व समाजाशी चांगला संबंध आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, भारतीय संविधान आणि सर्व धर्म समभाव,समता,स्वातंत्र,सामाजिक न्याय या संविधानिक मुल्यांची त्यांना जाणिव असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेनुसार त्या केरळ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे संघटन चांगले बांधत आहेत.त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने नुसरत जहा यांना केरळ राज्य शाखेचे अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार ना.रामदास आठवले यांनी नुसरत जहा यांची रिपब्लिकन पक्षाच्या केरळ प्रदेश अध्यक्ष पदी अधिकृत निवड जाहिर केली.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव राजीव मेनन उपस्थित होते.

रिपाइं चे राष्ट्रीय सचिव राजीव मेनन आणि नुसरत जहा यांच्या नेतृत्वात केरळ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे संघटन बळशाली होईल.याचा आपल्याला विश्वास असल्याचे ना.रामदास आठवले यांनी म्हटले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जातात नेते पी के रथकरण, रिपाइं चे केरळ राज्य उपाध्यक्ष सुधीश नायर कोविळमाला आदिवासी जमातीचे राजे रमणराजा मन्नन, केरळ प्रदेश रिपाइं अध्यक्ष के सी साजिथ, संघटक सचिव सुनिल मनांत, राज्यसचिव टी जी जयकुमार, इडूकी चे जिल्हा अध्यक्ष साजन जॉर्ज,राज्य सचिव श्रीमती सिन्हा, अँड.डॉ.रेगी केसवन नायर आदि मान्यवर उपस्थित होते.

आगामी केरळ विधानसभेच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत युती करून किमान 10 जागांवर रिपब्लिकन पक्ष निवडणुक लढवणार आहे.त्यादृष्टीने रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.

 

हेमंत रणपिसे

प्रसिद्धीप्रमुख

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

ठाकरे गटाचे ‘हे’ नेते अडचणीत, अनिल परब यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा अभिषेक सोहळा याचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त पूजा अर्चना करून प्रसाद वाटप भाजपाने धारावी विभागात केले

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे