vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे

हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे

मुंबई प्रतिनिधी-

‘हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, या दोन दिवसीय कार्यक्रमात देश विदेशातून १८ ते २० लाख भाविक येणे अपेक्षित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असून, मुख्य मंडपात एकावेळी ८० हजार ते १ लाख भाविक आसनस्थ होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र पार्किंग स्थळे ३८, विशेष तीन हेलिपॅडची व्यवस्था, २५ हजार भाविकांची निवास व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे १ हजार पेक्षा अधिक, स्वच्छता कर्मचारी ५०० पेक्षा अधिक उपलब्ध असणार आहेत.

नवी मुंबई येथे होणाऱ्या हिंद -दी- चादर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरद रावजी ढोले, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपालसिंग सिद्धू, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅपी सिंग उपस्थित होते.

#हिंददीचादर#श्रीगुरुतेगबहादुर#नवीमुंबई

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक तात्पुरती बंद

पैठणमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांचा जिल्हास्तरीय भव्य विक्री महोत्सव-महीला बचत गटांना एक कोटी कर्जाचे वितरण

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस

vishwatmaklokswamivarta

सायन कोळीवाडा जी. टी. बी. रेल्वे स्टेशन लटकत्या जाहिरात फलकावर कारवाई मागणी -रेल्वे प्रवासी