vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांच्या ‘ये जिंदगी उसी की है’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांना सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा

सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांच्या ‘ये जिंदगी उसी की है’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांना सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा..

 

सांस्कृतिक प्रतिनिधी-मुंबई,  : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांची सुरेलसुमधुर मैफल “ये जिंदगी उसी की है” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, ६ मार्च, २०२६ रोजी, रात्री ८.३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहृ विलेपार्ले येथे करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांचा समावेश आहे. यामध्ये गायक म्हणून प्राजक्ता सातर्डेकर, जय आजगावकर, सौम्या वर्मा, सुधाकर शानभाग आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असून निवेदक म्हणून मंदार खराडे काम पाहत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून विलेपार्ले परिसरातील रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक सुमधुर मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

हमाल दे धमाल’ चित्रपटाच्या**रम्य आठवणींना उजाळा* `विशेष शो’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* 

vishwatmaklokswamivarta

मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.

राज्यपालांच्या हस्ते १५ युवा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ सन्मानित-नव्या नवेली नंदा, मोना सिंग, जेनेलिया देशमुख सन्मानित

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या ‘Undocumented.PDF’ लघुपटाच्या वर्ल्ड प्रीमिअर विषयी कुतूहल! स्थलांतर, मानवी भावना आणि वास्तवाला भिडणारा नाफा फिल्म्सचा नवा लघुपट!

vishwatmaklokswamivarta