vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

450 हून अधिक महिला स्वच्छताकर्मींनी घेतला विशेष आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ

450 हून अधिक महिला स्वच्छताकर्मींनी घेतला विशेष आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ

 

        नवी  मुंबई प्रतिनिधी नवी स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला केंद्रीत स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिलांना सहभागी करुन घेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

          त्यानुसार आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात महिला स्वच्छता कर्मचा-यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, कान,नाक,घसा तपासणी, नेत्र तपासणी, पॅथोलॉजी, रक्त तपासणी अशाप्रकारे 450 हून अधिक महिला स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली तसेच अधिक तपासणीची गरज जाणवलेल्या महिला स्वच्छताकर्मींना महानगरपालिका रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले.

 

          यावेळी आयोजित रक्तदान शिबीरात 50 हून अधिक नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी सेवाभावी दृष्टीने रक्तदान केले.

 

          नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी आरोग्य शिबीराच्या ठिकाणी भेट देत कामकाजाची पाहणी केली.

 

          अशाप्रकारे स्वच्छताकर्मींच्या आरोग्य तपासण्या नियमित करण्यात याव्यात व त्यांच्याकडे आपल्या आरोग्य स्थितीचा रेकॉर्ड असावा यादृष्टीने त्यांना हेल्थ कार्ड देण्यात यावे, ज्यावर त्यांच्या तपासण्यांचा तपशील नोंदीत राहील. याव्दारे त्यांची प्रत्येक कालावधीतील आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी उपयोग होईल असे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी दिले.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर – २४३ जणांची तपासणी

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान”स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार.

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता- 67 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला मलेरिया – डेंग्यू प्रतिबंधात्मक जाहीर शिबीरांचा लाभ

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ

सशक्त बालक हीच देशाची खरी संपत्ती;संपूर्ण समाज निरोगी व सशक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ- सुदृढ बालकांसाठी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन