vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन

दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन

 

अमरावती, प्रतिनिधी): राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या मासिक अनुदानात हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना दरमहा 2 हजार 500 रुपये अनुदान थेट बँक खात्यात मिळणार आहे. मात्र, या वाढीव लाभाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ऑनलाईन युडीआयडी कार्ड आणि आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेतील 21 हजार 359 आणि श्रावणबाळ योजनेतील 1 हजार 913 अशा एकूण 23 हजार 272 लाभार्थ्यांचे युडीआयडी कार्ड अद्याप आधारशी संलग्न नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही दिव्यांग लाभार्थी या वाढीव लाभापासून वंचित राहू नये, यासाठी लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स संबंधित गावातील तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात 20 मार्च 2026 पूर्वी जमा करावे. तसेच, लाभार्थ्यांनी स्वतःहून युडीआयडी पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास अनुदानात अडचणी येऊ शकतात, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट

सौर उर्जा प्रकल्पामुळे दूध उत्पादक सभासदांना फायदा – मंत्री हसन मुश्रीफ सहकारी संस्थेचा देशातील पहिला सौर उर्जा प्रकल्प करमाळ्यात; गोकुळ सहकारी दुध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठीकृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे उपोषण मागे..

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन…

अग्निवीर भरतीसाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे१० ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजन; इच्छुक युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन